पुण्यात आणखी एक संतापजनक घटना:वीस वर्षीय कॅब ड्रायव्हरचे महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर समोर गैरवर्तन; महिलेची कॅबमधून उडी

पुण्यात आणखी एक संतापजनक घटना:वीस वर्षीय कॅब ड्रायव्हरचे महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर समोर गैरवर्तन; महिलेची कॅबमधून उडी

पुण्यातील गुन्हेगारीच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे. स्वारगेट परिसरात बस मध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील कल्याणी नगर परिसरात असलेल्या एका वीस वर्षीय कॅब ड्रायव्हरने महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर समोर गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर महिलेने कॅब मधून उडी मारली तसेच थेट पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. वास्तविक 21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजताच ही घटना घडली आहे. मात्र, ती आता समोर आली आहे. पुण्यातील कल्याणी नगर परिसरात ही घटना घडली आहे. या परिसरात एका कंपनीतील महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरने प्रवास करण्यासासाठी कॅब बुक केली होती. त्यानंतर संगमवाडी रोडवर तिला घेण्यासाठी एक कॅब आली. या दरम्यान गाडी चालवत असताना आरोपी ड्रायव्हर तरुणाने रियल व्हिव्ह मिरर मधून महिलेकडे पाहून हस्त मैथुन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे भयभीत झालेल्या तरुणीने महामार्गावर गाडी थांबवून थेट पोलिस स्टेशन गाठले. याप्रकरणी खडकी पोलिसांनी वीस वर्षीय कॅब ड्रायव्हरला अटक देखील केली आहे. खडकी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन चोरमले यांनी दिलेला माहितीनुसार आरोपी सुमित कुमार हा मूळचा उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील रहिवासी आहे. तो नुकताच मुंबईवरून पिंपरी चिंचवड येथे कामासाठी आला होता. पुण्यात काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यातच महिलांच्या सुरक्षेबाबत घडत असलेल्या घटनेमुळे याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पुण्यातील घटना संतापजनक पहाटे पाचच्या सुमारास तुरळक वर्दळ असलेल्या पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात एका नराधमाने 26 वर्षीय प्रवासी तरुणीवर शिवशाहीमध्ये बलात्कार केला. मंगळवारी पहाटे ही घटना घडली. पीडित तरुणीने लगेच काही तासांत तक्रारही दिली. मात्र पोलिसांनी प्रकरणाची चर्चा होऊ दिली नव्हती. अखेर बुधवारी हा प्रकार उघडकीस आला. अत्याचार करून फरार झालेला आरोपी स्थानकातील सीसीटीव्हीत कैद झाला. दत्तात्रय रामदास गाडे (35, रा. शिक्रापूर, पुणे) असे त्याचे नाव असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची 8 पथके रवाना झाली आहेत. आरोपी गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी शिरूर व शिक्रापूर येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सध्या तो जामिनावर सुटलेला आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment