बसमध्ये आधी तरुणी पुढे गेली मग माझा नवरा गेला:दोनच मिनिटात ते बाहेर आले, याला बलात्कार म्हणतात का? दत्तात्रय गाडेच्या बायकोचा मोठा दावा

बसमध्ये आधी तरुणी पुढे गेली मग माझा नवरा गेला:दोनच मिनिटात ते बाहेर आले, याला बलात्कार म्हणतात का? दत्तात्रय गाडेच्या बायकोचा मोठा दावा

स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे आणि ती मुलगी एकमेकांना एक महिन्यांपासून ओळखत होते. दोघांमध्ये जे झाले ते संगनमताने झाले असून बलात्कार झाला नसल्याचा दावा दत्तात्रय गाडेच्या वकिलांनी केला होता. आता दत्तात्रय गाडेच्या पत्नीने देखील आरोपीची पाठराखण करत मोठा दावा केला आहे. बसमध्ये चढताना आधी तरुणी पुढे गेली मग माझा नवरा गेला. त्यानंतर दोनच मिनिटात ते बाहेर आले, याला बलात्कार म्हणतात का? असा सवाल दत्तात्रय गाडेच्या बायकोने उपस्थित केला आहे. पुण्यात पार्क केलेल्या बसमध्ये आरोपी दत्तात्रय गाडे याने 26 वर्षीय मुलीवर बलात्कार केला होता. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली होती. बुधवारी दुपारी हे प्रकरण समोर आले. पोलिसांनी आरोपीला गुरुवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. यानंतर, त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्याला 12 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात सुरु आहे. या प्रकरणात आणखी कोणत्या महत्त्वाच्या बाबी समोर येतात ते ही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. काय म्हणाली दत्तात्रय गाडेची बायको?
मी दत्ता गाडे यांची पत्नी या नात्याने मला पण न्याय पाहिजे. ती मुलगी म्हणतेय की, माझ्या नवऱ्याने बलात्कार केला आहे. बलात्कार केला तर मग तिचे कपडे कुठे फाटले आहेत का? तिच्या अंगावर काही ओरबाडलेले दिसत आहे का? बसमध्ये चढताना आधी तरुणी पुढे गेली मग माझा नवरा गेला. त्यानंतर दोनच मिनिटात ते बाहेर आले, याला बलात्कार म्हणतात का? असा सवाल दत्ता गाडेच्या पत्नीने उपस्थित केला आहे. त्या पीडितेच्या सहमतीने शारीरिक संबंध झाले असल्याचेही दत्तात्रय गाडेच्या बायकोने म्हटले आहे. तिच्यावर बलात्कार होत होता तर त्या तरुणीने आरडाओरड का केली नाही? असा सवाल देखील गाडेच्या कुटुंबियांनी केला आहे. दत्तात्रय गाडे आणि तरुणी दोघांच्या संमतीने संबंध निर्माण झाल्याचा आरोपीचे वकील आणि पत्नीने दावा केल्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. दत्तात्रय गाडेच्या वकिलांचा दावा काय?
स्वारगेट बस डेपो मध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या वकिलांनी मोठा दावा केला आहे. या प्रकरणात दत्तात्रय गाडे आणि ती मुलगी एकमेकांना एक महिन्यांपासून ओळखत होते. दोघांमध्ये जे झाले ते संगनमताने झाले असून बलात्कार झाला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. ते दोघे एकाच बसमधून खाली उतरले, ते बस मधून कोठे गेले? याची माहिती घेण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. या दोघांमध्ये पैशांचा वाद झाला होता. त्यानंतर दत्तात्रय गाडे पळून गेल नाही तर तो त्याच्या गावी गेला होता. मात्र गावाला पोलिस छावणीचे रूप आल्याने तो लपून बसला, अशी माहिती देखील दत्तात्रय गाडे च्या वकिलांनी न्यायलयात दिली. आरोपीची डीएनए चाचणी होणार
आरोपी दत्तात्रय गाडेची डीएनए चाचणी होणार असल्याची माहिती आहे. या चाचणीसाठी त्याचे रक्त आणि केस फोरेन्सिक लॅबला पाठवले आहेत. बसची फॉरेन्सिक चाचणी त्यात पोलिसांना पुरावे मिळाले आहेत. ससून रुग्णालयात आरोपीची लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली ती पण पॉझिटिव्ह आली आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment