गंगापूर येथील होळकर स्मारक येथे बस थांबा:प्रवाशांची गैरसोय दूर होणार

गंगापूर शहरातील कायगाव रोडवरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासमोर बसथांबा सुरू करण्यात आला आहे. येथे आता बस थांबणार असल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. गंगापूर शहरातील कायगाव रोडवरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासमोर बसथांबा सुरू करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. या मागणीबाबत रावसाहेब तोगे यांनी संबंधितांकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार बुधवारी सकाळी कन्नड येथून गंगापूर मार्गे श्रीरामपूरला जाणारी बस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथील बस थांब्यावर थांबवून आगार प्रमुख विजय बोरसे, कार्यशाळा अधीक्षक बालाजी टाटेवाड यांच्या हस्ते बस थांब्याचे नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मा. उपनगराध्यक्ष रावसाहेब तोगे, ज्ञानेश्वर साबणे, संतोष अंबिलवादे, अनिस बाबा, प्रभाकर साबणे, प्रभाकर जाधव, साहेबराव पाटील आदींची उपस्थिती होती.