शाळेच्या प्रवेशद्वाराजवळील अतिक्रमणाकडे पंचायतीचे दुर्लक्ष:ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त

सिल्लोड तालुक्यातील गव्हाली येथील प्राथमिक शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ शाळेच्या जागेवर अतिक्रमण करून टपऱ्या थाटल्या आहे. याबाबत पंचायत समितीने ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीला शाळेच्या जागेवर झालेले अतिक्रमण काढण्यात वारंवार निवेदन देऊनही अतिक्रमण हटवण्यात आले नाही. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाकडून अतिक्रमणधारकांना अभय दिले जात असल्याचे दिसत आहे.त्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्राथमिक शाळेच्या प्रवेशद्वाराला लागून काही लोकांनी टपऱ्या बसवून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना टपऱ्यांमुळे रस्त्यावतील वाहने दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता मोठया प्रमाणात आहे. ही जागा गावठाण म्हणून आरक्षित असताना काही लोकांनी या जागेवर टपऱ्या बसवून अतिक्रमण केले आहे. या टपऱ्या मधून अवैध धंदे ही केले जात आहे. याचा त्रास विद्यार्थी, मुली, शिक्षकांना होतो. शालेय व्यवस्थापन समितीने निवेदन देऊनही त्या निवेदनाला कराची टोपली दाखवली आहे. खुद ग्रामपंचायत अधिकारी यांनी प्रतिनिधी यांना अतिक्रमण विषयी विचारले असता अजब उत्तर दिले आहे. मला वेळ नाही अतिक्रमण काढायला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा काढू असे बोलले आहे. त्यामुळे खुद ग्रामपंचायत कार्यालयच अतिक्रमणधारकांना अभय देत असल्याचे यावरून दिसत आहे.