शहरामध्ये 12 दिवसांत चोरट्यांचा 40 घरे फोडून 36 लाखांवर डल्ला:सर्वसामान्यांच्या घामाच्या पैशांसह सोन्यावर लुटारूंनी केले हात साफ‎

शहरामध्ये 12 दिवसांत चोरट्यांचा 40 घरे फोडून 36 लाखांवर डल्ला:सर्वसामान्यांच्या घामाच्या पैशांसह सोन्यावर लुटारूंनी केले हात साफ‎

शहरात चोरट्यांनी सध्या धुडगूस घातला आहे. बंद घर दिसले की फोडले. मग ते रात्र असो की दिवस. चोरट्यांना कोणाचाही वचक राहिलेला नाही. मागील १२ दिवसांत शहरातील विविध भागात चोरट्यांनी तब्बल ४० घरं फोडून ३६ लाखांच्या रकमेवर हात साफ केला आहे. विशेष म्हणजे या ४० घरांमध्ये चोरी करणारा एकही चोरटा पोलिसांच्या अजूनही हातात आला नाही. वारंवार होणाऱ्या या चोऱ्यांमुळे शहरातील नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. चोरट्यांनी मागील १२ दिवसात तीन परिसरात साखळी चोऱ्या केल्यात. त्यामध्ये सर्वाधिक एसआरपीएफ वसाहतीतील चोऱ्या आहेत. ४ मार्चला पहाटेदरम्यान चोरट्यांनी या परिसरात तब्बल १३ घरं फोडली आहेत. ही १३ ही घरे एसआरपीएफ जवानांची आहे. या भागात २४ तास एसआरपीएफ जवानांचा सशस्त्र पहारा असतो, तरीही चोरट्यांनी अवघ्या दोन तासात या १३ घरांमध्ये थैमान घातले. त्यानंतर नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहाटगाव रिंगरोड भागातही एकाच दिवशी दोन घर फोडली होती. त्यामध्ये एकाच घरातून चोरट्यांनी तब्बल १७ लाखांच्या ऐवजावर हात साफ केले होते. त्यानंतर राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील गणपती नगरमध्ये एकाच रात्री महिला पोलिस निरीक्षकाच्या घरासह पाच घरांमध्ये चोरी केली होती. महिला पोलिस निरीक्षकांच्या घरातून ३ लाख ८० हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला होता. त्यानंतर गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील तपोवन परिसरात एकाच दिवशी सहा घरं फोडली होती. अशा साखळी चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. मात्र मागील १२ दिवसांपासून एकही चोरटा पोलिसांच्या हातात आला नाही. सर्वसामान्य व्यक्ती आयुष्यभर भविष्याची तरतूद म्हणून पै पै गोळा करून सोन्याचे दागिने करतो, काही रक्कम गोळा करतो. परंतु चोरटे मात्र अवघ्या काही मिनिटांत त्याच्या आयुष्यभराच्या मेहनतीवर हात साफ करून निघून जातात. त्यामुळे नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. ^शहरात नुकत्याच झालेल्या चोऱ्या, घरफोडी या एका परप्रांतीय टोळीने केल्याचे आमच्या तपासात समोर येत आहे. या टोळीला पकडण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. ती टोळी पकडल्यानंतर अलीकडे झालेल्या चोरी, घरफोडींपैकी बहुतांश गुन्हे उघड होणार आहे. -नवीनचंद्र रेड्डी, पोलिस आयुक्त. ठाणे चोरी,घरफोडी रक्कम फ्रेजरपुरा १५ १३५५०० ० गाडगेनगर १० ९३७३८४ राजापेठ ६ ३९८००० कोतवाली ३ ६७००० नांदगाव पेठ ३ ६५८३०० बडनेरा ४ १२३००० वलगाव १ ७०००० एकूण ४२ ३६०८९८४ (शहरात घडलेल्या चोरी, घरफोडी, जबरी चोरीची संख्या ४२ असून, यामध्ये दोन घटना दुचाकी चोरीच्या आहेत. या घटनांप्रकरणी वेगवेगळ्या ठाण्यांमध्ये २० गुन्हे दाखल आहेत.) आयुक्तालय हद्दीत १२ दिवसात घडलेल्या घटना घरफोड्या करणारी परप्रांतीय टोळी आता रडारवर

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment