135 सिलिंडरसह 2.13 लाखांचा मुद्देमाल जप्त:लोणी काळभोरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरमधून चोरी करणारा तरुण अटकेत

135 सिलिंडरसह 2.13 लाखांचा मुद्देमाल जप्त:लोणी काळभोरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरमधून चोरी करणारा तरुण अटकेत

घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅसची चोरी केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट 6 ने एकाला बेड्या ठोकल्या. ही कारवाई लोणी काळभोर परिसरात करण्यात आली. यावेही लहान मोठे तसेच कमर्शिअल असे 135 सिलिंडर व गॅस भरण्यासाठी लागणारे पाईप, नोझल असा 2 लाख 13 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मदन माधव बामणे (20, रा. महादेव मंदिराजवळ, लोणी काळभोर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. युनिट 6 येथील पोलिस निरीक्षक वाहिद पठाण व युनिट 6 कडील पथक हे लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना अमंदार शेखर काटे यांना महादेव मंदिराजवळ एका ठिकाणी मोठ्या सिलिंंडरधमून लहार सिलिंडरमध्ये गॅस अवैध पध्दतीने भरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार युनिट 6 ने ही कारवाई केली. आरोपीवर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक मदन कांबळे, उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल जाधव, अमंदार बाळासाहेब ककटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेरेले, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार यांच्या पथकाने केली. आम्हीच इथले भाई म्हणत दहशत पसरविणार्‍यांवर गुन्हा कात्रज गाव येथील कुंभार वाड्याजवळ गप्पा मारत बसलेल्यांना यश घोडके व गणेश माळवे कोठे आहेत अशी विचारणा करत आम्ही इथले भाई आहोत अशी धमकी देत दहशत पसरविणार्‍या पाच जणांवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोहम धुमाळ, संकेत रेणुसे, ओंकार वाठार व त्याच्या अन्य एका साथीदारा विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सार्थक कुंभार (19, र ा. कात्रज) याने फिर्याद दिली आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment