जाफर एक्स्प्रेस हायजॅकमध्ये हात; पाकचा आराेप भारताने फेटाळला:हायजॅकमधील 33 बलुच बंडखाेरांना ठार केल्याचा पाक लष्कराचा दावा

जाफर एक्स्प्रेसवरील बलुचांच्या हल्ल्यात हात असल्याचा पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने केलेला आराेप भारताने फेटाळला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी हे विधान केले हाेते. त्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, “पाकिस्तानने केलेले निराधार आरोप आम्ही ठामपणे फेटाळतो. जागतिक दहशतवादाचा केंद्रबिंदू कुठे आहे हे संपूर्ण जगाला माहीत आहे. पाकिस्तानने इतरांकडे बोट दाखवण्याऐवजी स्वतःच्या अंतर्गत समस्यांकडे लक्ष द्यावे. दरम्यान, रेल्वे हायजॅक करणाऱ्या ३३ बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या (बीएलए) बंडखोरांना ठार केल्याचा दावाही पाकिस्तानने केला आहे. दरम्यान, बीएलएचे प्रवक्ते जियंद बलुच यांनी सांगितले की “लढाई अजूनही अनेक आघाड्यांवर सुरू आहे.” पाकिस्तानी लष्कराने ना युद्धभूमीवर विजय मिळवला आहे ना त्यांच्या बंधक कर्मचाऱ्यांना वाचवले आहे. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या सैनिकांना वाऱ्यावर साेडले आहे. २०२४ पासूनचे १८ हल्ले ३० जानेवारी २०२४ : माच टाउनमध्ये तीन हल्ले. २४ दहशतवादी ठार झाले, चार सुरक्षा कर्मचारी मृत.
२० जानेवारी २०२४ : ग्वादर पोर्ट अथॉरिटी कॉलनीवर हल्ला. दोन सैनिक शहीद झाले.
२६ मार्च २०२४ : तुर्बत येथे सिद्दीकवर हल्ला फसला, सहा ठार झाले.
१३ एप्रिल२०२४ : नौशकीजवळ बसवर गोळीबार. नऊ प्रवासी ठार.
१० मे २०२४ : सरबंदन येथे सात कामगारांची हत्या.
२३ जून २०२४ : हर्नाईत १४ जणांचे अपहरण.
२७ जून २०२४ : कलात येथे हल्ला. दोन ठार.
१३ ऑगस्ट २०२४ : पांजगुरला उपआयुक्त झाकीर हुसैन यांची हत्या.
२७ ऑगस्ट २०२४ : बलुचिस्तानमध्ये हिंसाचार. ५० जणांचा मृत्यू.
७ ऑक्टाेबर २०२४ : कराची विमानतळाजवळ चिनी कामगारांवर हल्ला. दोन ठार, आठ जखमी.
३० ऑक्टाेबर २०२४ : पाच सुरक्षा रक्षकांची हत्या.
९ नाेव्हेंबर २०२४ : क्वेटा रेल्वे स्थानकावर आत्मघाती हल्ला. २६जण ठार.
१७ नाेव्हेंबर २०२४ : जोहान, कलात येथे हल्ला. सात सुरक्षा कर्मचारी ठार.
५ जानेवारी २०२५ : तुर्बत हल्ला. ६ ठार, ३५ जखमी.
९ जानेवारी २०२५ : खुजदार बाजारावर हल्ला. बँक शाखा लुटली.
१ फेब्रुवारी २०२५ : कलात जिल्ह्यात १८ सैनिक ठार. १२ दहशतवादी ठार.
१९ फेब्रुवारी २०२५ : बरखान जिल्ह्यात प्रवाशांची हत्या. सात ठार.
३ मार्च २०२५ : कलात येथे महिला आत्मघाती हल्ला. एक जण ठार. महिला, मुले आणि वृद्धांना बंधमुक्त केले अपहृत रेल्वेतून सुटका झाल्यानंतर क्वेटा येथे पोहोचलेल्या प्रवाशांनी पाकिस्तानी माध्यमांना सांगितले की बलुच लढवय्यांनी रेल्वेगाडी ताब्यात घेतल्यानंतर महिला, मुले आणि वृद्ध व्यक्तींना स्वेच्छेने मुक्त केले. बलुचांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना स्वतंत्र पत्रकार आणि निष्पक्ष निरीक्षकांना संघर्ष क्षेत्रात प्रवेश देण्याचे आव्हान दिले आहे. गटाचा दावा आहे की लष्कराच्या अशा प्रवेशास नकार देणे त्यांच्या “पराभवाचे” प्रदर्शन आहे. बंडखाेरांना मारल्यावरूनही आराेप-प्रत्याराेप रेल्वे हायजॅकनंतर क्वेटा येथे सेवा थांबविण्यात आली आहे. त्यामुळे स्थानकात असलेला शुकशुकाट. पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी जाफर एक्स्प्रेस हायजॅक करणाऱ्या ३३ बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) बंडखोरांना ठार केल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी लष्कराने या “यशस्वी ऑपरेशन’चे कोणतेही छायाचित्र किंवा व्हिडिओ प्रसिद्ध केलेले नाहीत. दुसरीकडे, बंडखोर बीएलएने आयएसपीआरवर पराभव लपवण्याचा आरोप केला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment