राज ठाकरे भांग पिऊन बोलतात:भाजपच्या कृपाशंकर सिंग यांची टीका, मनसेने दिला कानाखाली आवाज काढण्याचा इशारा

राज ठाकरेंना आपण काय बोलत आहोत, उद्या काय बोलणार आहोत? हे त्यांना कळत नाही. मला वाटतं राज ठाकरे सकाळी-सकाळी उठून भांग वगैरे असे काही तरी घेतात, आणि भांग पिऊन मस्त राहातात, अशी टीका भाजपचे नेते कृपाशंकर सिंग केली आहे. दरम्यान तुमची लायकी नाही राज ठाकरे साहेंबावर टीका करायची आणि जो कोणी राज ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करेल त्याच्या कानाखाली आवाज निघेल असे म्हणत कृपाशंकर सिंग यांच्या या टीकेवर मनसेकडून देखील जोरदार पलटवार करण्यात आला आहे. नेमके कृपाशंकर सिहांचे वक्तव्य काय? कृपाशंकर सिह म्हणाले की, राज ठाकरे काही बोलले तर समजेल की त्यांना वेड लागलंय. त्याला कधी कळलेच नाही की आज काय बोलले आणि उद्या काय बोलले. मला वाटते राज ठाकरे सकाळी उठल्यानंतर भांग घेतात. भांग घेऊन मस्त राहतात. संध्याकाळी ये माझ्या बांधवानो. माझ्या मनसैनिकांनो काहीतरी करा आणि ते काय वेगळं करतात समजत नाही. त्यांना पण भांग पाठवतो. खोपकरांनी लायकीच काढली अमेय खोपकर म्हणाले की, कृपाशंकर सिंहला इशारा देण्याइतका तो काही मोठा राजकारणी नाहीये. त्याची पात्रता नाहीये. राज ठाकरे म्हणतात, तसे कृपाशंकर सिंह हा एक फेरीवाला आहे. आज या पक्षात, तर उद्या त्या पक्षात. राज्यात सगळीकडे धुळवडीचा उत्साह आहे. सगळे मज्जा करताय. कशाला उगीच गलिच्छ राजकारण करायचं?, असा सवाल करत अमेय खोपकर यांनी केला आहे. तर तुमची लायकी नाही राज ठाकरे साहेंबावर टीका करायची आणि जो कोणी राज ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करेल त्याच्या कानाखाली आवाज निघेल, असा इशारा खोपकर यांनी दिला आहे.