न्यायालय तुमच्या दारी:गावांतच न्यायालय; १६०० कुटुंबांना न्याय वर्षभरात ८०० प्रकरणे निकाली

उत्तर प्रदेशातील उन्नावचे ६० वर्षीय रमेश हे १० वर्षांपासून जमिनीच्या वादाचा खटला लढत होते. त्यांना तारखांवर तारखा मिळत. ते निराश होऊन परतायचे. मग ‘न्यायालय तुमच्या दारात’ उपक्रम आला. निर्णय एकाच दिवसात मिळाला. उन्नावमध्ये, वर्षानुवर्षे कोर्टात सुरू असलेले असे ८०० खटले वर्षभरात निकाली निघून १६०० कुटुंबांना दिलासा मिळाला. उन्नावचे जिल्हाधिकारी गौरांग राठी यांनी एका वर्षापूर्वी ‘न्यायालय तुमच्या दारात’ हा अनोखा उपक्रम सुरू केला. असे होतात निर्णय गावांमध्ये कोर्ट भरवले जाते. अधिकारी उपस्थित राहतात. डीएम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर सुनावणी घेतात. अधिकारी निर्णयाच्या त्वरित अंमलबजावणीची व्यवस्था करतात. यामुळे सरकारी यंत्रणेचा गैरवापर कमी झाला. वादी-प्रतिवादींनाही मोठा दिलासा मिळाला. गावांत मिळू लागला न्याय उन्नावचे डीएम गौरांग राठी यांचा हा उपक्रम इतका प्रभावी ठरला की पंतप्रधान कार्यालयानेही त्याची दखल घेतली. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावण्यात आली. या उपक्रमाच्या सन्मानाची प्रक्रियाही सुरू झाली.