अंडरस्टॅंडिंग अर्बनायझिंग पेरिफेरीज ऑफ पुणे प्रदर्शन:वास्तुशास्त्र विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातून मांडल्या पायाभूत सुविधा आणि समस्यांवरील उपाय

अंडरस्टॅंडिंग अर्बनायझिंग पेरिफेरीज ऑफ पुणे प्रदर्शन:वास्तुशास्त्र विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातून मांडल्या पायाभूत सुविधा आणि समस्यांवरील उपाय

पुण्याबाहेरील शहरीकरण, शहरीकरण होताना निर्माण होणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि पर्यावरणीय समतोल अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांनी ‘अर्बनायझिंग पेरिफेरीज ऑफ पुणे’ या प्रदर्शनात पुण्याच्या उपनगरांमधील शहरीकरण सखोल अभ्यासातून उलगडले. विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने ‘अंडरस्टॅंडिंग अर्बनायझिंग पेरिफेरीज ऑफ पुणे’ या विशेष प्रदर्शनाचे आयोजन यशवंतराव चव्हाण कलादालन येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रस्टचे चेअरमन ॲड. अभय छाजेड, सचिव जितेंद्र पितळीया आणि संचालक प्रसन्न देसाई यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ॲड. अभय छाजेड म्हणाले, विकास आराखडे तयार करताना अर्बन प्लॅनिंगकडे खूप कमी लक्ष दिले जाते. महाराष्ट्र आज जवळजवळ ५०% शहरीकरणाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. मुंबईपेक्षाही पुणे शहराची वाढ वेगाने होत आहे. अशी वाढ होत असताना पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा यांची योग्य आखणी आवश्यक आहे. यासाठी वेगळ्या निधीची तरतूद केली पाहिजे. पुण्याच्या परिघीय शहरीकरणाचा सखोल अभ्यास विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मधील चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ‘अर्बन डिझाईन’ अभ्यासक्रमांतर्गत विविध अभ्यास प्रकल्प सादर केले आहेत. प्रा. हृषीकेश अष्टेकर, देवेंद्र देशपांडे, गरिमा बुरागोहैन, गुंजन महेश्वरी, व मीनाक्षी सरावगी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच, महाविद्यालयाचे संचालक आर्किटेक्ट प्रसन्न देसाई व समन्वयक आर्किटेक्ट शेखर गरुड यांनी या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment