माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; २७ वर्षांनंतर आले एकत्र:माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा

माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; २७ वर्षांनंतर आले एकत्र:माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा

प्रतिनिधी |सिल्लोड सिल्लोड तालुक्यातील पालोद येथील यशवंत विद्यालयातील १९९८ सालच्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा तब्बल २७ वर्षानंतर स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. यावेळी खेळीमेळीच्या वातावरणात जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. माजी मुख्याध्यापक दिवाण शिंदे, टी. बी. जंजाळ, पांढरे, काकडे, गोरे आदींची उपस्थिती होती. सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शिक्षकांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. माजी विद्यार्थ्यांनी शाळेला घड्याळ भेट दिली. शिक्षक ज्ञानेश्वर काकडे यांनी सुखी जीवनासाठी वेळ काढून गेट-टुगेदर व्हायलाच पाहिजे, असे मत व्यक्त केले. तसेच व्यवसाय किंवा नोकरी करणाऱ्या बरोबरच शेतकऱ्यांनी स्वतःला मालक समजणे आवश्यक आहे. कारण शेतकरी हा सर्वांचा पोशिंदा आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर इतर शिक्षकांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. सूत्रसंचालन रत्नप्रभा बोराडे यांनी तर नियोजन डॉ. राहुल पालोदकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी माजी विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment