जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी गावनिहाय दौरा करणार:राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. प्रताप ढाकणे

जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी गावनिहाय दौरा करणार:राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. प्रताप ढाकणे

प्रतिनिधी | पाथर्डी सर्वसामान्य जनता संकटात असेल तर, गप्प बसून कसे चालेल? कार्यकर्त्यांना घेऊन संघर्षासाठी सज्ज झाल्याचे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. प्रताप ढाकणे यांनी शेवगाव-पाथर्डी तालुक्यांच्या सर्व समस्या जाणून घेऊन त्याबाबतचा विशेष अहवाल करणार आहे. खा. नीलेश लंके यांच्यासह दोन्ही तालुक्यातील निवडक कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांना भेटून दाद मागणार आहोत. त्यासाठी येत्या एक एप्रिलपासून गावनिहाय मतदारसंघाचा दौरा सुरू करणार असल्याचे सांगितले. संस्कार भवनमध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे होते. योगेश रासाने, दिगंबर गाडे, वसंत बोर्डे, डॉ. दीपक देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासिर शेख, ॲड. दिनकर पालवे, शेवगावचे बंडू रासने, हुमायून आतार, बंडू बोरुडे आदी उपस्थित होते. ढाकणे म्हणाले, की गेल्या शंभर दिवसांत राज्य शासनाचे अस्तित्व कोठेही जाणवले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकारला घ्यायच्या आहेत, असे वाटत नाही. सरकारचे वकील सर्वोच्च न्यायालयात तारखा वाढवून मागतात. गाव पातळीवरची विकासकामे थांबली आहेत. सरकारला वाटते, सर्व संस्था आपल्या ताब्यात आहेत. बघू, निवडणुकीची एवढी घाई कशाला? प्रशासकाला काही देणे-घेणे नाही. लोकांसाठी पुन्हा सक्रिय होणार असून, दर सोमवारी पंचायत समिती, तहसील कार्यालयात गरजू लोकांबरोबर संवाद साधत त्यांच्या समस्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करू. येत्या काळात कोणती विकासकामे करायची, याचा कृती आराखडा तयार करून त्यासाठी खा. लंके संस्कार भवनमध्ये आढावा बैठकीत बोलताना ॲड. प्रताप ढाकणे. यांच्या माध्यमातून निधीची पूर्तता करण्याचा आपला प्रयत्न असेल. येत्या काळात प्रत्येक गावातील दहा नवीन युवकांना प्रशिक्षण देऊन तयार करणार असल्याचे ॲड. ढाकणे यांनी यावेळी सांगितले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment