छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवावी:हिंदुत्ववादी संघटनांकडून मागणी

छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवावी:हिंदुत्ववादी संघटनांकडून मागणी

प्रतिनिधी | राहाता छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी राहाता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने औरंगजेबाच्या विरोधात घोषणाबाजी करीत नायब तहसीलदार हेमंत पाटील यांना निवेदन देण्यात आले. घोषणाबाजी करीत बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हातात भगवे ध्वज घेऊन राहाता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नायब तहसीलदार हेमंत पाटील यांना निवेदन दिले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची यातना देत औरंगजेबाने हत्या केली. देशातील अनेक मंदिरांचा विध्वंस केला. अशा क्रूरकर्मा औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर ही पूर्णपणे स्वतंत्र भारत देशाचे गुलामीचे अनेक यातनांचे प्रतीक आहे. तरी ही कबर पूर्णपणे कुठलेही नामनिशाण न ठेवता योग्य पद्धतीने काढून टाकावी, अशी मागणी करण्यात आली. ही कबर काढून न घेतल्यास विहिंप व बजरंग दल छत्रपती संभाजीनगरकडे कार सेवेसाठी कुच करतील व ही कबर काढून टाकतील, असा इशाराही दिला. या निवेदनावर विहिंपचे जिल्हा संयोजक प्रमुख योगेश मखाना, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक शुभम मुर्तडक, तालुका संयोजक ईश्वर टिळेकर, दिनेश टाकेचा, मयूर चोळके, साई पानसरे, ज्ञानेश्वर पाडेकर आदींच्या सह्या आहेत.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment