नागपूर हिंसाचारावर असदुद्दीन ओवेसी संतापले:म्हणाले – सरकारच चिथावणी देत आहे, मुख्यमंत्री-मंत्री आहोत याचेही भान त्यांना नाही

नागपूर हिंसाचाराला सरकार जबाबदार असल्याचे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी म्हणाले. सरकारकडून आणि सरकारच्या मंत्र्यांकडून भडकाऊ विधाने केली जात असल्याचे ते म्हणाले. आपण मंत्री आहोत, मुख्यमंत्री आहोत ह्याचेही त्यांना भान नाही, अशी टीका ओवेसी यांनी केली. मंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांची विधाने बघा. सरकारचे चिथावणी देत आहे, अशा शब्दांत ओवेसी यांनी नागपूरमधील घटनेवर संताप व्यक्त केला. ते दिल्लीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी नागपूरमधील हिंसेवरून सरकारवर जोरदार निशाणा साधला. औरंगजेब कबरीच्या वादावरून सोमवारी रात्री 8:30 वाजता नागपूरच्या महाल परिसरात हिंसाचार उसळला. विश्व हिंदू परिषदेने (VHP) मुघल सम्राट औरंगजेबाचा पुतळा जाळला आणि त्याची कबर पाडण्याची मागणी केली. यानंतर दगडफेक आणि तोडफोड सुरू झाली. दंगलखोरांनी घरांवर दगडफेक केली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या वाहनांना आग लावली. पोलिसांवरही हल्ला झाला. यामध्ये अनेक पोलिस कर्मचारी जखमी झालेत. या हिंसाचारावर बोलताना असदुद्दीन ओवेसी यांनी या घटनेला राज्य सरकार जबाबदार असल्याचे सांगितले. नेमके काय म्हणाले ओवेसी? गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून हे वक्तव्य केले जात आहे, ते पाहायला हवे. सर्वात मोठे भडकाऊ वक्तव्य सरकारकडून आणि सरकारच्या मंत्र्यांकडून केले जात असल्याचे असदुद्दीन ओवेसी म्हणाले. आपण मंत्री आहोत, मुख्यमंत्री आहोत ह्याचेही त्यांना भान नाही, अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी काही बादशहांचे फोटो जाळण्यात आले. मात्र, त्याचा कुठेही परिणाम झाला नाही म्हणून तुम्हाला त्रास झाला. त्यामुळे, कुराणवर जे लिहिले जाते ते एका कपड्यावर लिहिले होते, तो कपडा जाळला. यासंदर्भात हिंदू व मुस्लीम लोकांनी पोलिसांकडे जाऊन हे थांबवण्याची विनंती केली होती. मात्र, पोलिसांनी कुठलीही अॅक्शन घेतली नाही. नागपूरमधील घटना गुप्तचर यंत्रणांचे अपयश पोलिसांनी अॅक्शन न घेतल्यामुळे रात्री हिंसाचार घडला. मी त्या हिंसाचाराचा निषेध करतो. मात्र, मंत्र्यांकडून होत असलेल्या भडकाऊ वक्तव्यांकडे पाहिले पाहिजे, असे खासदार असदुद्दीन औवेसी यांनी म्हटले. मला कुणाची कुठली तरी गोष्ट आवडत नाही. तुम्हाला कुणाची कुठली तरी गोष्ट आवडत नाही. मग कुणीही कायदा हातात घेऊन नावडत सांगणार का? हे बघण्याची गरज आहे. हे चुकीचे घडत आहे. सरकारची चूक आहे. गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे, असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले. तुम्ही सत्तेत आहात, तुमची विचारधारा बाजुला ठेवा नागपूर हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे शहर आहे. हा जो हिंसाचार झाला आहे, तो केंद्रीय मंत्र्यांच्या घराजवळ झाला आहे. हे खूप चुकीचे घडत आहे. तुम्ही सत्तेत आहात आणि तुमची जी विचारधारा आहे, ती बाजूला ठेवा. तुमची विचारधारा असायला हवी भारताचे संविधान आणि कायद्याचे पालन करणे. 6 डिसेंबर 1992 ला काय घडले? त्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याला अग्रीगेस अॅक्ट म्हटले. तर तुम्ही बघा. सत्ता तुमची आहे. मंत्री तुमचे आहे. कायद्याची पालन आणि अंमलबजावणी तुम्हाला करायची आहे, असे ओवेसी म्हणाले. हे ही वाचा… औरंगजेबाची कबर हटवणे सोपा विषय:त्यात दंगल करायचे कारण काय, केंद्राकडे ते थडगे काढण्याची मागणी करा – उद्धव ठाकरे नागपूर दंगलीवरून उद्धव ठाकरे यांनी आज महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला. थडगे काढण्यासाठी आंदोलने करण्यापेक्षा केंद्र सरकारकडे जाऊन औरंगजेबाचे थडगे काढण्याची मागणी करा, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला. औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकार संरक्षण देतेय, तर मग औरंगजेब तुमचा कोण लागतो. नागपूरची घटना पूर्वनियोजित असेल, तर तुमचे गृह खाते झोपा काढत होते का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. पूर्ण बातमी वाचा… नागपूर दंगलीवर मुख्यमंत्र्यांचे निवेदन:धार्मिक मजकूर जाळल्याच्या अफवेने हिंसाचार झाला; ‘छावा’चा दाखला देत औरंगजेबावर भाष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत नागपूर दंगलीवर विस्तृत भाष्य केले. त्यात त्यांनी जनतेला एकमेकांप्रती आदरभाव बाळगून संयम राखण्याचे आवाहन केले. तसेच कुणी दंगल करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जात, धर्म न पाहता कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला. विशेषतः पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सरकार सोडणार नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले. पूर्ण बातमी वाचा…