ट्रम्प यांचे अमेरिका फर्स्ट हे ‘इंडिया फर्स्ट’सारखेच- गबार्ड:भारत आणि अमेरिका संंबंध आणखी दृढ होणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘अमेरिका फर्स्ट’ धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘इंडिया फर्स्ट’ कटिबद्धतेसारखेच आहे, असे अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालक तुलसी गबार्ड यांनी म्हटले. पण याचा अर्थ केवळ अमेरिकाच पुढे जाणे नव्हे, असे स्पष्टीकरणही त्यांनी रायसीना चर्चेत बोलताना दिले. गबार्ड म्हणाल्या, ट्रम्प प्रशासन भारताशी संरक्षणासह सर्वच क्षेत्रांत संबंध मजबूत करण्याच्या दिशेने काम करत आहे. तथापि, त्यांनी खलिस्तान समर्थक तत्त्वांच्या हालचाली किंवा ट्रम्पकडून २ एप्रिलपासून मित्रराष्ट्रांवर परस्पर शुल्क लावण्याच्या घोषणेचा उल्लेख केला नाही. वॉशिंग्टनमध्ये मोदी व ट्रम्प यांची भेट झाली होती याची आठवण करून देत त्यांनी ही वैयक्तिक मैत्री दोन्ही नेत्यांची नेतृत्वशैली आणि आपापल्या देशातील गरजांना प्राधान्य देण्याची कटिबद्धता असल्याचे म्हटले. जयशंकर म्हणाले, काश्मीरवर सर्वात दीर्घ अवैध कब्जा परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले की, पाकिस्तानने १९४८ पासून काश्मीरवर कब्जा केलेला आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या निष्पक्षतेच्या उणिवेवर प्रश्न उपस्थित केला. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक नियम समान लागू केले नाहीत. काश्मीरप्रश्नी आम्ही संयुक्त राष्ट्राकडे गेलो. पण जे अतिक्रमण होते, त्याला वादाचे रूप दिले. हल्लेखोर आणि पीडितांना समान पातळीवर ठेवले गेले. या परिस्थितीसाठी ब्रिटन, कॅनडा, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेस त्यांनी जबाबदार ठरवले.