नराधम विशाल गवळी आत्महत्या प्रकरण:बातमी कळताच पीडितेच्या वडिलांनी घातला लेकीच्या फोटोला हार, म्हणाले- ‘जसास तसे’ न्याय मिळाला

नराधम विशाल गवळी आत्महत्या प्रकरण:बातमी कळताच पीडितेच्या वडिलांनी घातला लेकीच्या फोटोला हार, म्हणाले- ‘जसास तसे’ न्याय मिळाला

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत खून केल्याची घटना डिसेंबर 2024 मध्ये घडली होती. यातील आरोपी विशाल गवळीने रविवारी (13 एप्रिल 2025) पहाटे तळोजा कारागृहात आत्महत्या केली. नराधम विशाल गवळीला नवी मुंबई येथील तळोजा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. इथेच त्याने आत्महत्या केली आहे. ही माहिती कळताच मृत पीडित मुलीच्या वडिलांनी लेकीच्या फोटोला हार घातला व दिवा लाऊन पूजन केले. विशाल गवळीने आत्महत्या केल्याची बाटमिओ समोर येताच मृत मुलीच्या वडिलांनी व कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. तसेच वडिलांनी आपल्या मृत लेकीच्या फोटोला हार घालत पूजन केले. मृत लेकीच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, आमच्या दीदीसोबत नराधमाने जे कृत्य केले, त्यासाठी आम्ही कोर्टात लढत होतो. विशाल गवळीने जे काही कृत्य केले होते, त्याची शिक्षा त्याला देवाने दिली. त्याच्यासोबत ‘जशास तसे’ न्याय झाला. यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. पोलिसांनीही आम्हाला खूप सहकार्य केले आणि पाठिंबा दिला. मी त्यांचाही आभारी आहे, अशा भावना वडिलांनी व्यक्त केल्या आहेत. पुढे बोलताना पीडितेच्या वडिलांनी भीती देखील व्यक्त केली आहे. विशाल गवळीचे कुटुंबीय अजूनही कल्याणमध्ये दहशत पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशाल गवळीचे दोन्ही भाऊ तडीपार आहेत. ते या परिसरात दहशत निर्माण करायचा प्रयत्न करत असतात. त्यांच्याकडे हत्यारे आहेत. विशाल गवळीचे वडील गुन्हेगारी वृत्तीचे आहेत. ते आमच्या कुटुंबावर हल्ला करू शकतात, अशी भीती पीडितेच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, विशाल गवळीच्या वकिलांनी ही आत्महत्या नसून अक्षय शिंदे सारखेच विशाल गवळीसोबत झाले असल्याचा आरोप केला आहे. तर पीडितेच्या वकिलांनी विशालच्या आत्महत्यावर समाधान व्यक्त केले आहे. पीडितेचे वकील नीरज कुमार म्हणाले, आरोपी विशाल गवळी याला न्यायालयाच्या माध्यमातून कठोर शिक्षा झाली पाहिजे होती. त्याला फाशी व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्याने आत्महत्या केली तरी एका प्रकारे आम्हाला न्याय मिळाला आहे. त्याला फाशी झाली असती तर अत्याचारसारखे कृत्य करणाऱ्यांवर कायद्याची दहशत राहिली असती. त्याने आत्महत्या जरी केली तरी आम्हाला न्याय मिळाला आहे, असे आम्हाला वाटते, अशी प्रतिक्रिया नीरज कुमार यांनी दिली आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment