भंडाऱ्याजवळ चारचाकीचा भीषण अपघात:दुभाजकाला धडकून कार पलटली, पत्नीचा जागीच मृत्यू तर पतीसह दोघे गंभीर जखमी

भंडाऱ्याजवळ चारचाकीचा भीषण अपघात:दुभाजकाला धडकून कार पलटली, पत्नीचा जागीच मृत्यू तर पतीसह दोघे गंभीर जखमी

भंडारा येथील पाचगावजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री बाराच्या सुमारास हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने नागपूर येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची अधिकची माहिती अशी, नातलगाकडील लग्नकार्य आटोपून नागपूरला परत जात असताना पाचगाव जवळील कुही फाट्यावर झालेल्या चारचाकीच्या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर पतीसह अन्य दोघे गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना 14 एप्रिल, सोमवारी रात्री बारा वाजताच्या दरम्यान घडली आहे. अपघातग्रस्त भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोहली येथील रहिवासी असून येथील कृष्णा फर्निचर मार्टचे मालक कृष्णा शेंडे यांची पत्नी नीलम कृष्णा शेंडे वय (२६) हिचा जागीच मृत्यू झाला आहे. कृष्णा शेंडे त्यांची तीन वर्षाची मुलगी देवाशी तर साळा हेमंत असे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना नागपूर येथील दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. कृष्णा शेंडे हा आपल्या परिवारासह त्यांच्या नागपूर येथील नातलगांच्या लग्नसभारंभास गेले होते. नागपूर येथून ब्रम्हपुरी येथे लग्नकार्य आटोपून सोमवारी रात्री परत नागपूरला स्वतःच्या चारचाकी वाहनाने जात असताना पाचगाव जवळील कुही फाट्यावरील उड्डाण पुलावर अचानक चारचाकी वाहन दुभाजकाला आदळल्याने पलटी मारली. यात कृष्णा शेंडे यांची पत्नी नीलम शेंडेचा जागीच मृत्यू झाला. तर स्वतः कृष्णा शेंडे अत्यंत गंभीर अवस्थेत असल्याची माहिती आहे. सदर घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्तांना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment