गुजरातमध्ये मद्यावर बंदी, त्यामुळे तस्करीची शक्यता:मप्रचे गुजरात सीमेवर मद्य तस्करीचे सात ‘कॉरिडॉर’, छोट्या गावात मोठा ठेका

मध्य प्रदेशच्या नव्या मद्य धोरणामुळे गुजरात सीमेनजीक आदिवासी भागांना तस्करीच्या अघोषित कॉरिडॉरमध्ये रूपांतरित केले आहे. झाबुआ आणि अलीराजपूर जिल्ह्यांत दारूच्या दुकानांचे वाटप ७ गटांत झाले आहे. ही दुकाने सीमेपासून फक्त ५०० मी.ते ५ किमी कक्षेत आहेत. गुजरातमध्ये दारूबंदी आहे. मप्रच्या धोरणामुळे सीमावर्ती क्षेत्रांतून मद्याची तस्करी वाढली आहे. एवढेच नव्हे तर लिलावात या दुकानांची बोली अनेक ठिकाणी १२ ते १६ कोटी रु.पर्यंत पोहोचली. विशेष म्हणजे, या गावांची लोकसंख्या १५०० ते ५००० दरम्यान आहे. यातही बहुतांश बीपीएल आहेत. सर्वात मोठे उदाहरण झाबुआच्या मंडली गावचे आहे. येथे २५०० च्या लोकसंख्येमागे एक विदेशी मद्याच्या दुकानाचा १३ कोटींमध्ये लिलाव झाला. येथील निम्मी लोकसंख्या मद्य पिते,असे मानले तरीही प्रत्येक व्यक्तीला एका वर्षात एक लाखाचे मद्य प्यावे लागेल. तर ठेकेदाराची गुंतवणूक निघू शकेल. म्हणजे, येथे गणित स्थानिक विक्रीपेक्षा गुजरातमध्ये संभाव्य तस्करीच्या दृष्टीने योग्य बसते. सर्वसाधारणपणे एका समूहात दूर्गम व लोकसंख्येचे क्षेत्र मिळून वितरण ठेवले जाते. मात्र,झाबुआ तसेच अलीराजपूरमध्ये प्रत्येक पूर्ण कॉरिडॉर दिले. देशी दारू दुकान विदेशी दारू दुकान 1. मेघनगर समूह- मंडलीत सर्वात महाग दुकान
ठेकेदार : मालवा रिॲल्टी एकूण मूल्य : ₹९२ कोटी
दुकाने : ५ विदेशी, ५ देशी. मंडलीत विदेशी दारूचे दुकान १३ कोटींत लिलाव. लोकसंख्या २५०० आहे, यात १२५० बीपीएल.
2. झाबुआ समूह- पिटोलमध्ये १६ कोटींचे दुकान
ठेकेदार: गुरुकृपा बायोफ्युएल एलएलपी एकूण मूल्य: ₹११९ कोटी दुकाने: ६ विदेशी, ४ देशी, पिटोल गुजरात सीमेपासून २.५ किमी दूर. लोकसंख्या ५०००, मात्र, २५०० बीपीएल. बोली १६ कोटी लागली, म्हणजे दरडोई वार्षिक वापर ३२,००० बसतो.
3. थांदला समूह- बट्ठात ₹८ कोटींचे दुकान
ठेकेदार: गुरुकृपा बायोफ्यूल एलएलपी एकूण मूल्य: ₹७६ कोटी
दुकाने: ७ विदेशी, ६ देशी. बट्टाची लोकसंख्या १५००. सुमारे ७५० बीपीएल. दारूची दुकान ८ कोटींत लिलाव झाले. हे गाव गुजरातपासून ५ किमी दूर आहे. दरडोई वापर १ लाख होतो.
4. उदईगड समूह- सेजवाडात एक दुकान ₹8 कोटी रुपयांचे
मूल्य: ₹४१.६३ कोटी. दुकाने:४ विदेशी, २ देशी.
सेजवाडा गुजरात सीमेपासून फक्त ८०० मीटरवर. लोकसंख्या २५०० आहे.
यापैकी १५०० बीपीएल कुटुंबे आहेत. एक दुकान ८ कोटींत लिलाव.
5. जोबट समूह- काठिवाडात ६.५९ कोटींचे दुकान
एकूण मूल्य: ₹२६.५९ दुकाने: ३ विदेशी, २ देशी
काठिवाडा गुजरात सीमेपासून ५ किमी दूर. लोकसंख्या ३५०० आहे, यापैकी २००० बीपीएल. लिलाव बोली ६.५९ कोटी. दरडोई वार्षिक वापर १८,८०० अंदाजित आहे.
6. नानपूर समूह- चाकतलात ६.०७ कोटींचे दुकान
एकूण मूल्य: ₹२५.१० कोटी दुकाने: ४ विदेशी, १ देशी
चाकतला गाव गुजरात सीमेपासून फक्त ४०० मीटरवर. लोकसंख्या सुमारे ५००० आहे, त्यापैकी ३००० बीपीएल आहेत. लिलाव बोली ६.०७ कोटी. येथे स्थानिक मागणीपेक्षा जास्त पुरवठा.
7. चंदपूर समूह- ₹१२.६० कोटींचे दुकान, सीमेपासून २.५ किमी
एकूण मूल्य: ₹२४.१९ कोटी दुकाने: २ विदेशी, १ देशी
चंदपूर गावचे दुकान ₹१२.६० कोटीत लिलाव. हे गुजरात सीमेपासून २.५ किमी अंतरावर आहे.लोकसंख्या ५००० आहे, यात सुमारे ३००० लोकसंख्या बीपीएल. दरडोई वार्षिक वापर २५,००० च्या आसपास.