उद्धव ठाकरेंच्या शिबिरावरून लक्ष हटवण्यासाठीच दर्ग्यावर कारवाई:’हिम्मत असेल तर समोर येऊन लढा’; संजय राऊत यांचे भाजपला आव्हान

नाशिकमध्ये दर्ग्यावर कारवाई करण्यासाठी भाजप आणि सत्ताधारी पक्षाने आजचाच दिवस निवडला. आज नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सर्व महत्त्वाचे नेते आहेत. शिवसेनेचे अधिवेशन होऊ नये, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यात दर्ग्यावर कारवाई करण्यासाठी मुद्दाम आजचाच दिवस निवडला असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आजच्या शिबिरावरून लक्ष हटवण्यासाठीच ही कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. हिम्मत असेल तर समोर येऊन लढा, त्यासाठी आमची तयारी आहे. मात्र त्यांना देश तोडायचा आहे, वातावरण खराब करायचे आहे, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत..