राज ठाकरेंच्या पोस्टची स्क्रिप्ट सागर बंगल्यावर लिहिली गेली:संजय राऊत यांचा निशाणा; म्हणाले- मोदी-शहांना इंग्रजी येत नसल्याने हिंदीची सक्ती

राज्यात हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या मुद्यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. इतकेच नाही तर हा निर्णय समोर येतात राज ठाकरे यांनीही मोठी पोस्ट केली होती. यावर देखील संजय राऊत यांनी टीका केली. इतक्या लवकर इतकी मोठी पोस्ट कशी केली गेली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या पोस्टची स्क्रिप्ट सागर बंगल्यावर लिहिली गेली असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. हिंदी भाषा विषयी मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मोठे ट्विट केले होते. एवढ्या कमी वेळात ते कसे केले? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. त्या ट्विट ची स्क्रिप्ट ही सागर बंगल्यावर लिहिली गेली असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीत भाजपचे कोणतेही योगदान नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आधी नोकरी, उद्योग, व्यवसाय यादी ठिकाणी मराठी भाषेचा सन्मान राहिला पाहिजे. तेथे आधी मराठी सक्तीची करा, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. मुंबईला हिंदी शिकवण्याची किंवा हिंदी लादण्याची गरज नाही मोदी आणि अमित शहा यांना इंग्रजी येत नाही. त्यामुळे हिंदीची सक्ती करण्यात येत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आधी इंटरनॅशनल शाळांमध्ये मराठी सत्तेची करा, त्याची हिंमत आहे का? असा प्रति प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. हिंदी ही आमच्यावर लालू नका, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. मुंबईला हिंदी शिकवण्याची किंवा हिंदी लादण्याची गरजच नाही. ज्या शहरात जगातला उत्कृष्ट हिंदी सिनेमा तयार होतो. तेथे हिंदी सक्ती करण्याची गरज नाही, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. अजूनही राज्यात अनेक ठिकाणी मराठी भाषा सक्तीची झाली नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीत भाजपचे कोणताही योगदान नाही मुख्यमंत्र्यांनी आधी माय मराठी कडे लक्ष दिले पाहिजे, असे आवाहन देखील संजय राऊत यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीत भाजपचे कोणताही योगदान नाही, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे आमच्यावर हिंदी लादू नका, सक्ती करू नका, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. हिंदी ही देशातील संवादात्मक भाषा आहे. तिला आमचा विरोध नाही. मात्र, ती न लादण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.