पुणे पोर्शे अपघात प्रकरणी मेडिकल कौन्सिलचा मोठा निर्णय:रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द, पोलिसांच्या मागणीला यश

पुणे पोर्शे अपघात प्रकरणी मेडिकल कौन्सिलचा मोठा निर्णय:रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द, पोलिसांच्या मागणीला यश

पुणे येथील पोर्शे अपघात प्रकरणातील रक्ताचे नमुने बदलणाऱ्या दोन डॉक्टरांवर मेडिकल कौन्सिलने मोठी कारवाई करत प्रकरणातील अंतिम निर्णय येईपर्यंत वैद्यकीय परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात आला आहे. हे दोघेही डॉक्टर ससून रुग्णालयात कार्यरत होते. गेल्या वर्षी मे महिन्यात पुणे येथील कल्याणी नगर भागात एक भीषण अपघात झाला होता. या अपघातात दोघांचा जीव गेला होता. दारूच्या नशेत भरधाव पोर्शे कार चालवत या दोघांना चिरडण्यात आले होते. भरधाव कार चालवणारा हा मोठ्या बिल्डरचा मुलगा होता. त्यामुळे ससून रुग्णालयातील डॉक्टरांना पैसे देऊन त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. मुलाच्या रक्ताच्या ठिकाणी आईच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. तसेच हे प्रकरण समोर आल्यानंतर डॉ. तावरे आणि डॉ. हळनोरे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. तसेच त्यांचा वैद्यकीय परवाना रद्द करावा अशी मागणी पुणे पोलिसांनी केली होती. त्याच्यावर मेडिकल कौन्सिलने आज निर्णय दिला आहे. काय होते पोर्शे प्रकरण? 19 मे 2024 च्या मध्यरात्री पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. पबमध्ये पार्टी करून परत जात असताना अल्पवयीन मुलगा भरधाव वेगात पोर्शे कार चालवत होता. त्याने मागून एका दुचाकीला जोरदार धडक दिली, ज्यामध्ये दुचाकीवरील तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर सुरू झालेल्या नाट्यमय घडामोडींनी संपूर्ण शहर हादरून गेले. आरोपी हा शहरातील प्रसिद्ध बिल्डर अग्रवाल यांचा मुलगा असल्याचे पुढे आले. त्याला वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप आणि आर्थिक बळाचा वापर करून प्रयत्न करण्यात आल्याचे आरोप झाले. पोलिस, वैद्यकीय कर्मचारी आणि अन्य यंत्रणा यामध्ये गुंतल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात पोलिसांनी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. अल्पवयीन आरोपीचे आई-वडील, ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एकूण दहा जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला शिक्षा म्हणून फक्त निबंध लिहण्याचे आदेश देण्यात आले, ज्यामुळे पुणेकरांमध्ये प्रचंड संताप व्यक्त झाला. अपघाताचा व्हिडीओ समोर आल्यावर आणि त्याला मिळालेली शिक्षा पाहून जनतेचा रोष आणखी वाढला. परिणामी, पोलिसांनी याप्रकरणात अधिक कठोर कारवाई सुरू केली आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment