दिव्य मराठी अपडेट्स:पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू, दिग्दर्शक प्रवीण तरडेंच्या मित्रानेही जीव गमावला

दिव्य मराठी अपडेट्स:पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू, दिग्दर्शक प्रवीण तरडेंच्या मित्रानेही जीव गमावला

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स… पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता देशभरातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला असून पोलिसांकडून गस्त वाढवण्यात आली आहे. तर संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सविस्तर वाचा पहलगाम हल्ल्यात दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा जीवलग मित्र गमावला जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला. पर्यटनासाठी गेलेल्या लोकांना धर्म विचारून गोळीबार करण्यात आला. या धक्कादायक घटनेचा तीव्र निषेध होत असून देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. अशातच लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडेंच्या मित्रानेही या हल्ल्यात जीव गमावला आहे. तरडे यांनी एक पोस्ट शेअर करत माहिती दिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात मुंबईत निदर्शने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात मुंबईत आज जोरदार निदर्शने करण्यात आली. ​​​​​​शिवसेना नेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांच्या मुख्य उपस्थितीत आज निदर्शने करण्यात आले. पहलगाम हल्ला: नागपुरातील 40 ते 50 कुटुंब सुखरूप, 2 दिवसात परत येणार
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात नागपुरातील 40 ते 50 कुटुंब सुखरूप आहे. ते दोन दिवसात परत येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डाॅ. विपीन ईटनकर यांनी दिली. या सर्व कुटुंबातील सदस्य सुखरूप असून त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने सुरू केलेल्या जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून माहिती दिली. एक दोन दिवसात सर्व जण परत येतील असे ईटनकर यांनी सांगितले. पहलगाम दहशतवादी हल्ला: महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी दोघांची ओळख पटली आहे. संतोष जगदाळे यांच्या डोक्यात, कानात आणि पाठीत गोळ्या लागल्या. तर कौस्तुभ गणबोटे यांच्या पाठीवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. सविस्तर वाचा जे करायचे ते करा मात्र, आम्हाला येथून सुरक्षित बाहेर काढा- रुपाली ठोंबरे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली ठोंबरे या देखील केले जम्मू-काश्मीरला गेलेल्या आहेत. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर त्यांनी आम्ही सर्वजण सुखरुप असल्याचे त्यांनी सांगितला आहे. तसेच अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्र येण्यासाठी तात्काळ सोय करण्याची विनंती देखील त्यांनी सरकारकडे केली आहे. सविस्तर वाचा
करारा जबाब म्हणजे काय 2-4 मशिदी पाडणार का?- राऊत पहलगाम दहशतवादी हल्ल्याला करारा जबाब देंगे म्हणजे काय दोन चार मशिदी पाडणार का? हिंदू-मुसलमान करणार का, यापेक्षा हे लोकं काय वेगळे करू शकतात, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर बिहारच्या निवडणुकीसाठी भाजपवाले आता याचे राजकारण करतील असेही त्यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सेलिब्रिटी संतप्त जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संताप आहे. अमिताभ बच्चन, अजय देवगण आणि कमल हासन यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. संजय दत्तने नरेंद्र मोदींना टॅग करून एक पोस्ट शेअर केली आहे. सविस्तर वाचा पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर राज ठाकरे आक्रमक जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केंद्र सरकारला कडक कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. इतकेच नाही त्यासाठी मनसे सरकारच्या पाठीशी पूर्णपणे उभी असल्याचा विश्वासही राज ठाकरे यांनी दिला आहे. सविस्तर वाचा ज्यांनी हल्ला केला, त्या सर्वांना टिपून टिच्चून काढा- जितेंद्र आव्हाड पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये मंगळवारी सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतरआमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच देश बांधवांवर हल्ला करणाऱ्या सर्वांना टिपून टिच्चून काढा म्हणत, त्यासाठी जाहीर पाठिंबा असल्याचेही म्हटले आहे.सविस्तर वाचा TMKOC अभिनेते ललित मनचंदा यांनी केली आत्महत्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. या शोचा भाग असलेले अभिनेते ललित मनचंदा यांनी आत्महत्या केली आहे. सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन (CINTAA) ने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. CINTAA ने इंस्टाग्रामवर अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आणि त्यांना त्यांचा सदस्य म्हटले. सविस्तर वाचा
सेन्सेक्सने 80 हजारांचा टप्पा ओलांडला, 500 अंकांनी वाढ आठवड्याचा तिसरा ट्रेडिंग दिवस, शेअर बाजार आज तेजीत आहे. सेन्सेक्स 500 पेक्षा जास्त अंकांनी वाढून 80,000 च्या वर व्यवहार करत आहे. निफ्टी देखील सुमारे 150 अंकांनी वाढला आहे, तो 24,300 च्या वर आहे. सेन्सेक्समधील 30 पैकी 27 शेअर्सच्या किमतीत वाढ झाली आहे. एचसीएल टेकचे शेअर्स सुमारे 6% ने वाढले आहेत. टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि इंडसइंड बँक सुमारे 3% वाढले आहेत. सविस्तर वाचा

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment