व्वा… रे पठ्ठ्या:’साताऱ्याचा बाहुबली’ म्हणत तरुणाचा व्हिडिओ व्हायरल; दुचाकी खांद्यावर घेऊन केला रस्ता पार, वेगवेगळ्या प्रतिक्रिया

व्वा… रे पठ्ठ्या:’साताऱ्याचा बाहुबली’ म्हणत तरुणाचा व्हिडिओ व्हायरल; दुचाकी खांद्यावर घेऊन केला रस्ता पार, वेगवेगळ्या प्रतिक्रिया

सातारा जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे नदी – नाले दुथडी भरून वाहत आहेत. दुसरीकडे या पावसामुळे रस्त्यांवर देखील चिखल झाला आहे. त्यामुळे रस्त्यावरून वाहने चालवणे अवघड झाले आहे. यातच सातारा जिल्ह्यातील एका युवकाचा दुचाकी खांद्यावर घेऊन रस्ता पार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. साताऱ्याच्या या गड्याचा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. पहिलवानांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याची ओळख आहे. या सातारा जिल्ह्यातील एका तरुणाचा खांद्यावर मोटरसायकल घेतलेला व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चिखलमय रस्ता झाल्यामुळे रस्त्यावरून वाहन चालवणे अवघड झाले आहे. त्यातच रस्ता पार करण्यासाठी या तरुणाने थेट आपली दुचाकी खांद्यावर घेत रस्ता पार केला. आता या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील उमटत आहे. पावसाळ्यामुळे सर्व रस्ते चिखलयुक्त झाले असून खड्ड्यांमध्ये देखील पाणी साचले आहे. त्यामुळे वाहन चालवणे अशक्य बनले आहे. नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे याबाबत संबंधित विभागाने त्वरित दखल घ्यावी आणि तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी देखील आता या प्रकरणात होत आहे. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव आदी गावांत पावसामुळे रस्ते पूर्णतः बंद झाले आहेत. त्याचबरोबर मान, खटाव, फलटण आदी दुष्काळी तालुक्यात देखील पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे रस्ते बंद झाले असून वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. दुसरीकडे नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने पूरग्रस्तांना मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment