शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास नोंदणी फी माफ:मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीच्या सुधारीत धोरणास मान्यता

शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास नोंदणी फी माफ:मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीच्या सुधारीत धोरणास मान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय देखील आहे. शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीच्या सुधारीत धोरणास मान्यता दिली आहे. त्यामुळे आता अंशकालीन निदेशकांना देखील दिलासा मिळेल. त्याच बरोबर हातमाग महामंडळाच्या नागपूर येथील १९५ कर्मचाऱ्यांना ६ व्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ निर्णय

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment