शेतकऱ्यांसाठी सुधारित व्याज अनुदान, अल्पमुदतीची कर्जे स्वस्त:साेयाबीनला 5,328 तर कापसाला 7,710 क्विंटल आधारभूत किंमत

केंद्र सरकारने बुधवारी २०२५-२६ च्या खरीप हंगामासाठी धानाच्या (भात) किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) ३%, कडधान्यांमध्ये ५.९६% आणि तेलबियांमध्ये ९% वाढ केली. यासह, धानाच्या किमान आधारभूत किमतीत ६९ रुपयांची वाढ झाली आहे. आता ती २,३६९ रुपये प्रतिक्विंटल झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने याला मान्यता दिली. नैऋत्य मान्सूनदरम्यान केलेल्या या घोषणेमुळे खरीप पिकांच्या पेरणीला चालना मिळेल. ही पिके देशाच्या एकूण वार्षिक अन्नधान्य उत्पादनात ५०% पेक्षा जास्त योगदान देतात. याशिवाय, शेतकऱ्यांसाठी सुधारित व्याज अनुदान योजना (एमआयएसएस) २०२५-२६ पर्यंत सुरू राहील. या योजनेअंतर्गत किसान क्रेडिट कार्डद्वारे अल्पकालीन कर्जे स्वस्त दरात मिळतात. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी १.५ टक्के व्याज अनुदानासह एमआयएसएस सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना सुरू ठेवल्याने सरकारी तिजोरीवर १५,६४० कोटी रुपयांचा भार वाढेल. महाराष्ट्रात लागवड क्षेत्र
सोयाबीन ५१ लाख हेक्टर
कापूस ४२.३४ लाख हेक्टर
ज्वारी १७.५३ लाख हेक्टर
भात १५.१७ लाख हेक्टर
तूर १२ लाख हेक्टर
बाजरी ८.११ लाख हेक्टर
मूग ७ लाख हेक्टर
मका ४.८४ लाख हेक्टर
उडीद ४ लाख हेक्टर अशी असेल नवीन किमान आधारभूत किंमत
पीक वाढ एकूण एमएसपी
रागी ५९६ ४८८६
ज्वारी(हा) ३२८ ३६९९
ज्वारी (मा.) ३२८ ३७४९
मका १७५ २४००
बाजरी १५० २७७५
तूर ४५० ८०००
उडीद ४०० ७४००
मूग ८६ ८७६८
शेंगदाणे ४८० ७२६३
सोयाबीन ४३६ ५३२९
तीळ ५७९ ९८४६
कापूस ५८९ ७७१०
(आकडे रुपये प्रतिक्विंटल भाव)