विट्स हॉटेलच्या लिलावातून बाहेर पडणार:माझ्या मुलाला टेंडर मागे घ्यायला सांगतो, माघार घेतल्यानंतर संजय शिरसाटांचा विरोधकांवर हल्लाबोल

विट्स हॉटेलच्या लिलावातून बाहेर पडणार:माझ्या मुलाला टेंडर मागे घ्यायला सांगतो, माघार घेतल्यानंतर संजय शिरसाटांचा विरोधकांवर हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर येथील विट्स हॉटेलचा लिलाव झाला होता त्यात संजय शिरसाट यांच्या मुलाने सहभाग घेतला होता. यावरून संजय शिरसाट यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांनी केला. यावर संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की लिलाव होण्याची ही पहिली वेळ नसून ही आठवी वेळ होती. तसेच 67 कोटी जी काही रक्कम सांगितली गेली होती ती कोर्टानेच सांगितलेले रक्कम असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच विट्स हॉटेलच्या लिलावातून बाहेर पडणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. संजय शिरसाट म्हणाले, संजय शिरसाट प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतो. परंतु हे जे दलाल फिरत आहेत ते कोणासाठी फिरत आहेत त्याचा छडा लावा आणि आजपासून उद्या माझ्या मुलाला ते टेंडरची जी काही प्रोसेस आहे, पत्र द्यायला लावतोय आणि त्या प्रकरणातून बाजूला होतोय. जे 110 च्या गप्पा करतात त्यांना सांगतो की आता तुम्ही घ्या पेढे घेऊन मी तुमच्याकडे येईल. आरोप करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले, तुम्ही 90 कोटीमध्ये घ्या नाहीतर 100 कोटीमध्ये घ्या नाहीतर 76 कोटीमध्ये घ्या, संजय शिरसाट तुमच्या स्वागताला येईल. मराठी माणूस उभा राहिला पाहिजे असे वाटत असेल न तर तुम्ही हिम्मत करा आणि असे आरोप करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा. रात्रीची उतरली नाही म्हणून असे स्टेटमेंट करून त्याची बातमी होऊ शकते परंतु कोणाचे चारित्र्यहणन नाही होऊ शकत. तुम्हाला याचे भोग भोगावे लागतील कोणाच्या धंद्यावर व्यवसायावर तुम्ही आज लात मारलेली आहे. माझे पैसे गेले असतील त्यात 10-15 लाख रुपये, जाऊ द्या. परंतु तुम्ही हे केलेले पाप तुम्हाला फेडावे लागेल. तुम्ही व्यवसायासाठी उभा राहणाऱ्याला जो खोडा टाकलेला आहे. तुमची इतरांची दलाली करण्यामध्ये जे आयुष्य गेलेले आहे, तुम्हाला याचे भोग भोगावे लागतील, असे संजय शिरसाट म्हणाले आहेत. तसेच या पुढे जर वैयक्तिक आरोप करायचे जर सुरुवात केली तर मला सुद्धा सर्व माहिती आहे. सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत. ज्या दिवशी मी ते बाहेर काढायला सुरुवात करेल, संजय शिरसाट आहे मी, घराला आग लावायची कमी करणार नाही मी. एवढा चक्रम आहे मी थोडा, असा इशाराही त्यांनी दिला आहे. पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले, राजकारणाच्या दृष्टीने तुम्ही आरोप-प्रत्यारोप करा त्याचे उत्तर देईल. परंतु व्यवसायात, मुला-बाळांमध्ये अशा चर्चा करत आहेत त्याचे परिणाम निश्चितच तुम्हाला काही काळात दिसून येतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment