आरोग्यमंत्र्यांकडून डॉक्टर निलंबित; सीएम सावंतांकडून 24 तासांत पुन्हा नियुक्ती:तपासणीदरम्यान मंत्री राणे यांना मिळाली होती डॉक्टरविरुद्ध तक्रार

गोव्यात सरकारी रुग्णालयातील एका डॉक्टरवरून आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या (जीएमसीएच) एका वरिष्ठ डॉक्टरला निलंबित करण्याचा आदेश दिल्यानंतर २४ तासांच्या आत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ते निलंबन मागे घेतले. शनिवारी रुग्णालयाच्या अचानक तपासणीदरम्यान आरोग्यमंत्री राणे यांनी डॉक्टरला फटकारले होते. डॉक्टर उपचार नाकारतात आणि रुग्णांशी गैरवर्तन करतात अशी तक्रार त्यांना मिळाली होती. याप्रकरणी संबंधिताचे निलंबित करण्याचा आदेश दिला. दुसरीकडे, शनिवारी डॉक्टरला निलंबित करण्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या आदेशावर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रविवारी मंत्री राणे म्हणाले की ते या प्रकरणात माफी मागणार नाहीत.
दुसरीकडे… आंध्रच्या मंत्र्यांनी रागात फेकला पुष्पगुच्छ
हैदराबाद |आंध्र प्रदेशच्या मागासवर्गीय मंत्री सविता एस यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान संतापाच्या भरात जिल्हाधिकाऱ्यांवर पुष्पगुच्छ फेकला. या घटनेचा व्हिडिओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. प्रत्यक्षात मंत्री सविता एका पेन्शन वितरण कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यांनी जिल्हाधिकारी प्रभावती यांना पहिल्या टप्प्यात किती मोफत गॅस सिलिंडर वाटप केले, असे विचारले. त्याचे उत्तर त्यांना देता आले नाही. त्यामुळे संतापलेल्या मंत्र्यांनी हे कृत्य केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment