रोल मॉडेल:केरळच्या शाळांचे रोबोटिक्स मॉडेल फिनलंडमध्ये, शिष्टमंडळाकडून भेट; 2 जूनपासून केरळमधील सर्व शाळांमध्ये रोबोटिक्स शिक्षण सक्तीचे

१० वीचे ४.३ लाख विद्यार्थी आता रोबोटिक्स विषय शिकणार
केरळमधील शाळांमध्ये सक्तीचे रोबोटिक्स शिक्षणाचे मॉडेल फिनलंड २ जूनपासून आपल्या देशात लागू करेल. यासाठी फिनलंडने आपले शिष्टमंडळ केरळला पाठवले आहे. केरळचे हे मॉडेल समजून घेण्यासाठी आणि अभिप्राय घेण्यासाठी प्रतिनिधी शाळांना भेट देत आहेत. केरळ शिक्षण विभागासोबत काम करणाऱ्या केरळ इन्फ्रास्ट्रक्चर अँड टेक्नॉलॉजी फॉर एज्युकेशनचे सीईओ के. अन्वर सादात म्हणाले, यापूर्वी केरळच्या शिक्षण विभागाची टीम फिनलंडचे शिक्षण मॉडेल समजून घेण्यासाठी फिनलंडला गेली होती. परंतु फिनलंडला शाळांमध्ये तांत्रिक शिक्षणात केरळच्या यशाची माहिती मिळाली तेव्हा ते केरळला आले. येथील शाळांना भेट दिल्यानंतर त्यांनी आपल्या देशातील सर्व शाळांमध्ये ते सक्तीचे करण्याची योजना आखली. ऑक्टोबर २०२३ च्या सुरुवातीला फिनलंडच्या शिक्षणमंत्री अन्ना माजा हेन्रिकसेन यांनी २२ सदस्यांसह शाळांना भेट दिली होती. विद्यार्थी रोबोटिक्स-एआय शिकले
सादात म्हणाले, राज्यात अंमलबजावणीपूर्वीच केरळच्या काही शाळांमधील दहावीच्या १५% मुलांनी रोबोटिक्स-एआय शिकले आहे. समस्या सोडवणारे आणि गंभीर दृष्टिकोन यावर विद्यार्थी सक्षम बनले. दहावीचे सर्व ४.३ लाख विद्यार्थी रोबोटिक्सचा अभ्यास करतील. कौशल्ये शिकून विद्यार्थी अधिक सर्जनशील
लिटिल काइट्स कार्यक्रम संयुक्त राष्ट्रांच्या जीवन कौशल्य आणि युनिसेफच्या हस्तांतरणीय कौशल्य मॉडेलशी सुसंगत आहे. विद्यार्थी सर्जनशील बनतात. केरळ फिनलंडला तज्ज्ञांची एक टीम आणि तांत्रिक मदत पुरवेल विशेष गोष्ट अशी की केरळ फिनलंडच्या सर्व शाळांमध्ये रोबोटिक्सचा सिद्धांत तसेच व्यावहारिक अभ्यासासाठी फिनलंडला तांत्रिक साहाय्य आणि तज्ज्ञांची एक टीम प्रदान करेल. यापूर्वीदेखील केरळने फिनलंडच्या शाळांमध्ये लिटिल काइट्स मॉडेल सुरू करण्यास फिनलंडला मदत केली होती. याअंतर्गत शाळांमध्ये मुलांना इलेक्ट्रॉनिक्स, अॅनिमेशन आणि एआयसारख्या तंत्रज्ञानात तयार करायचे होते. लिटिल काइट्सचे प्रशिक्षण घेतल्यानंतर मी अनेक रोबोटिक उपकरणे आणि खेळ बनवले. यामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला आहे.
-मुहम्मद हलीम, विद्यार्थी, एर्नाकुलम
शाळांत आता मुलांना डिजिटल युगासाठी तयार करत आहोत. रोबोटिक्ससारख्या जटिल गोष्टीही आता विद्यार्थ्यांसाठी सोप्या झाल्या. – सिंधू जॉय, शिक्षिका, कोझिकोड

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment