कोलकाता अत्याचार-हत्याप्रकरण:जिद्द मोठी आहे की आयुष्य?, सुप्रीम कोर्टाने डॉक्टरांना दिला होता सायं. 5 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

कोलकाता अत्याचार-हत्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने अल्टिमेटम दिल्यानंतरही डॉक्टरांनी कामावर परत येण्यास नकार दिला. कोर्टाने मंगळवारी सायं. ५ वाजेपर्यंत डाॅक्टरांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले. याचे पालन न केल्यास कडक कारवाईचा इशाराही दिला होता. तरीही डॉक्टरांनी मंगळवारी पोलिस मुख्यालय ते आरोग्य भवनापर्यंत मोर्चा काढला. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पोलिस आयुक्त, आरोग्य सचिव, आरोग्य शिक्षण संचालक व आरोग्य सेवा संचालकांच्या राजीनाम्यासह अत्याचारातील आरोपींवर कडक कारवाईची डॉक्टरांची मागणी आहे. दरम्यान, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संपकरी डॉक्टरांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत डॉक्टर चर्चेसाठी गेले नाही.
डॉक्टरांनी धुडकावले ममतांचे निमंत्रण संपकरी डॉक्टरांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे चर्चेचे निमंत्रण धुडकावले. ममता चर्चेसाठी सचिवालयात मंगळवारी सायंकाळी एक तास २० मिनिटे बसून होत्या. डाॅक्टरांचे नेते देबाशीष हालदर यांचा आरोप आहे की, १० डॉक्टरांना चर्चेसाठी बोलावले. मात्र, जास्त डॉक्टर जाऊ इच्छित होते. डॉक्टर काम बंद करत सामान्यांकडून बदला घेत आहेत का : पीडितेचा सवाल उपचाराअभावी माझा २२ वर्षीय मुलगा विक्रमने ७ सप्टेंबर रोजी रुग्णालयातच आपले प्राण सोडले. आता मला न्याय कोण देईल? हा सवाल कविता भट्टाचार्य यांनी केला. कोन्ननगरच्या कविता यांचा मुलगा विक्रमला रस्ते अपघातात जखमी झाल्यानंतर आरजी कार रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचार मिळाले नाही. खूप रक्त वाहिल्याने विक्रमचा मृत्यू झाला. माजी प्राचार्य घोषला २३ पर्यंत न्यायालयीन कोठडी कोलकाता न्यायालयाने आरजी कार मेडिकल कॉलेजचा माजी प्राचार्य संदीप घोषला २३ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याची मुदत संपल्यावर सीबीआयने मंगळवारी त्याला न्यायालयात आणले जात असताना जमावाने चोर, चोर अशा घोषणा दिल्या.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment