नांदेड अन् मुंबईत भाजप विरोधी पोस्टर्स:’तुम्ही उपाशी, भाजप तुपाशी’, ‘भारतीय जनतेचे पाकीटमार’ असा उल्लेख; वातावरण तापले

नांदेड अन् मुंबईत भाजप विरोधी पोस्टर्स:’तुम्ही उपाशी, भाजप तुपाशी’, ‘भारतीय जनतेचे पाकीटमार’ असा उल्लेख; वातावरण तापले

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याची राजधानी मुंबई व नांदेडमध्ये सत्ताधारी भाजपविरोधात पोस्टर्स लावण्यात आलेत. या पोस्टरवर भाजपचा उल्लेख भारतीय जनतेचे पाकीटमार असा करण्यात आला असून, त्याची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. राज्यात पुढील महिन्यात आचारसंहिता लागू होवून नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईल असा दावा केला जात आहे. त्यानुसार सत्ताधारी महायुती व विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीने मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड व मुंबईत भाजपविरोधी पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सद्वारे महागाईमुळे सर्वसामान्य जनतेच्या होणाऱ्या होरपळीवर भाष्य करण्यात आले आहे. विशेषतः यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा उल्लेख भारतीय जनतेचे पाकीटमार असा करण्यात आला आहे. या पोस्टरद्वारे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. भाजप सरकारच्या काळात महागाईमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आली असून, शेतकऱ्यांची अवस्थाही फार बिकट झाली आहे, असा संदेश त्यातून देण्यात आला आहे. तुम्ही म्हणजे जनता उपाशी अन् भाजप तुपाशी असाही उल्लेख यापैकी एका पोस्टरवर आहे. अमरावती येथे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी असेच पोस्टर लावले होते. त्यामुळे नांदेड व मुंबईतही युवक काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी हे पोस्टर्स लावले असावेत असा दावा केला जात आहे.
काय आहे पोस्टरवर? मुंबई, नांदेड व अमरावती या तिन्ही ठिकाणी लावण्यात आलेले पोस्टर एकसारखेच आहेत. या पोस्टरवर भाजपचा उल्लेख भारतीय जनतेचे पाकीटमार असा करण्यात आला आहे. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुकानावर खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीचा खिसा साफ करताना म्हणजे पाकीट मारताना दाखवण्यात आले आहे. हे सर्वकाही व्यंगचित्राच्या माध्यमातून दर्शवण्यात आले आहे. एवढेच नाही तर गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल व खाद्यतेलाच्या किंमतीत झालेल्या भरमसाठ वाढीचा मुद्दाही यात अधोरेखित करण्यात आला आहे. यासंबंधीच्या एका व्हायरल व्हिडिओतही महागाई व भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. अन्य एका पोस्टरवर टाईम फॉर खर्चावर चर्चा म्हणजे ही खर्चावर चर्चा करण्याची वेळ असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. जीएसटी, सावकारी आदी मुद्यांवरही याद्वारे प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. हे ही वाचा… हिंमत असेल तर राहुल गांधींचा बुरखा फाडा:आरक्षण रद्द करण्याच्या मुद्यावरून भाजप आमदार प्रसाद लाड यांचे मनोज जरांगेंना आव्हान मुंबई – भाजप आमदार प्रसाद लाड यांनी गुरुवारी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. लाड यांनी आता आरक्षण व्यवस्था संपुष्टात आणण्यासंबंधीच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या एका कथित विधानावरून जरांगे यांना कात्रित पकडण्याचा प्रयत्न केला आहे. उठसूठ भाजपवर टीका करणारे मनोज जरांगे आरक्षणाच्या मुद्यावरून राहुल गांधींना प्रश्न विचारतील का? विशेषतः राहुल गांधी हे ही फडणवीसांचाच माणूस असल्याचा आरोप ते करतील का? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. वाचा सविस्तर

​आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याची राजधानी मुंबई व नांदेडमध्ये सत्ताधारी भाजपविरोधात पोस्टर्स लावण्यात आलेत. या पोस्टरवर भाजपचा उल्लेख भारतीय जनतेचे पाकीटमार असा करण्यात आला असून, त्याची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. राज्यात पुढील महिन्यात आचारसंहिता लागू होवून नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईल असा दावा केला जात आहे. त्यानुसार सत्ताधारी महायुती व विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीने मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड व मुंबईत भाजपविरोधी पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सद्वारे महागाईमुळे सर्वसामान्य जनतेच्या होणाऱ्या होरपळीवर भाष्य करण्यात आले आहे. विशेषतः यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा उल्लेख भारतीय जनतेचे पाकीटमार असा करण्यात आला आहे. या पोस्टरद्वारे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. भाजप सरकारच्या काळात महागाईमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आली असून, शेतकऱ्यांची अवस्थाही फार बिकट झाली आहे, असा संदेश त्यातून देण्यात आला आहे. तुम्ही म्हणजे जनता उपाशी अन् भाजप तुपाशी असाही उल्लेख यापैकी एका पोस्टरवर आहे. अमरावती येथे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी असेच पोस्टर लावले होते. त्यामुळे नांदेड व मुंबईतही युवक काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी हे पोस्टर्स लावले असावेत असा दावा केला जात आहे.
काय आहे पोस्टरवर? मुंबई, नांदेड व अमरावती या तिन्ही ठिकाणी लावण्यात आलेले पोस्टर एकसारखेच आहेत. या पोस्टरवर भाजपचा उल्लेख भारतीय जनतेचे पाकीटमार असा करण्यात आला आहे. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुकानावर खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीचा खिसा साफ करताना म्हणजे पाकीट मारताना दाखवण्यात आले आहे. हे सर्वकाही व्यंगचित्राच्या माध्यमातून दर्शवण्यात आले आहे. एवढेच नाही तर गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल व खाद्यतेलाच्या किंमतीत झालेल्या भरमसाठ वाढीचा मुद्दाही यात अधोरेखित करण्यात आला आहे. यासंबंधीच्या एका व्हायरल व्हिडिओतही महागाई व भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. अन्य एका पोस्टरवर टाईम फॉर खर्चावर चर्चा म्हणजे ही खर्चावर चर्चा करण्याची वेळ असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. जीएसटी, सावकारी आदी मुद्यांवरही याद्वारे प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. हे ही वाचा… हिंमत असेल तर राहुल गांधींचा बुरखा फाडा:आरक्षण रद्द करण्याच्या मुद्यावरून भाजप आमदार प्रसाद लाड यांचे मनोज जरांगेंना आव्हान मुंबई – भाजप आमदार प्रसाद लाड यांनी गुरुवारी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. लाड यांनी आता आरक्षण व्यवस्था संपुष्टात आणण्यासंबंधीच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या एका कथित विधानावरून जरांगे यांना कात्रित पकडण्याचा प्रयत्न केला आहे. उठसूठ भाजपवर टीका करणारे मनोज जरांगे आरक्षणाच्या मुद्यावरून राहुल गांधींना प्रश्न विचारतील का? विशेषतः राहुल गांधी हे ही फडणवीसांचाच माणूस असल्याचा आरोप ते करतील का? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. वाचा सविस्तर  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment