आता आमची बार्गेनिंग पॉवर प्रचंड वाढली:शिवसेना आमदाराचा भाजपला इशारा; एकनाथ शिंदे हेच CM पदाचा चेहरा असल्याचा दावा

आता आमची बार्गेनिंग पॉवर प्रचंड वाढली:शिवसेना आमदाराचा भाजपला इशारा; एकनाथ शिंदे हेच CM पदाचा चेहरा असल्याचा दावा

विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असताना सत्ताधारी महायुतीत जागावाटपाच्या मुद्यावरून महाभारत रंगण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाची बार्गेनिंग पॉवर प्रंचड वाढल्याचा दावा करत शिवसेनेला समाधानकारक जागा हव्या असल्याचा इशारा भाजपला दिला आहे. आता आमची बार्गेनिंग पॉवर प्रचंड वाढली आहे. पण आम्हाला किती जागा हव्यात हे ही सांगणार नाही. कारण मी आकडा सांगितला तर मग वाचाळवीरांना आवरा अशी ओरड सुरू होईल, असे ते म्हणालेत. संजय शिरसाट यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी सद्यस्थितीत शिवसेनेचा स्ट्राईक रेट व बार्गेनिंग पॉवर कमालीचा वाढल्याचा दावा केला. ते म्हणाले, आता आमची बार्गेनिंग पॉवर प्रचंड वाढली आहे. हेच सत्य आहे. शिवसेना विधानसभा निवडणुकीत किती मागणार यावर मी बोलणार नाही. कारण मी आकडा सांगितला तर मग तुमच्या वाचाळवीरांना आवरा अशी ओरड सुरू होईल. त्यामुळे मी आकडा सांगणार नाही. पण शिवसेनेचा स्ट्राईक रेट सध्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहेत. यामुळे विधानसभा निवडणुकीत निश्चितच फरक दिसून येईल. आता फार अलर्ट राहण्याची गरज आहे. कारण सध्या कोण काय करेल याचा काहीच नेम नाही. राजकारणात दररोज नवनवे प्रयोग होतात. अपक्षही मुख्यमंत्रीपदाची दोर हाती घेऊ शकतात संजय शिरसाट म्हणाले, सद्यस्थितीत महाविकास आघाडीचे काहीच खरे नाही. त्यांची युती होणार किंवा नाही हे ही माहिती नाही. पण अपक्षांचा टेकू आम्हाला टेकू लागणार नाही हे निश्चित. आता दसऱ्याची वाट पाहत आहोत. या मेळाव्यात बरेच काही घडू शकते. 20-25 पक्ष आमदार यंदाच्या विधानसभा निवडणुकीत समीकरण काहीसे वर- खाली गेले तर ते सुद्धा मुख्यमंत्रीपदाची दोर हाती घेऊ शकतात. पण सध्या महायुती जोरात आहे. महायुती- मविआत जागावाटपावर चर्चा उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्यात लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीत जागावाटपाच्या मुद्यावर गरमागरम चर्चा सुरू आहे. त्यातच संजय शिरसाट यांनी आपल्या पक्षाची बार्गेनिंग पॉवर वाढल्याचे सूतोवाच करत ही चर्चा अधिकच गरम होईल अशी शक्यता वाढली आहे.

​विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असताना सत्ताधारी महायुतीत जागावाटपाच्या मुद्यावरून महाभारत रंगण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाची बार्गेनिंग पॉवर प्रंचड वाढल्याचा दावा करत शिवसेनेला समाधानकारक जागा हव्या असल्याचा इशारा भाजपला दिला आहे. आता आमची बार्गेनिंग पॉवर प्रचंड वाढली आहे. पण आम्हाला किती जागा हव्यात हे ही सांगणार नाही. कारण मी आकडा सांगितला तर मग वाचाळवीरांना आवरा अशी ओरड सुरू होईल, असे ते म्हणालेत. संजय शिरसाट यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी सद्यस्थितीत शिवसेनेचा स्ट्राईक रेट व बार्गेनिंग पॉवर कमालीचा वाढल्याचा दावा केला. ते म्हणाले, आता आमची बार्गेनिंग पॉवर प्रचंड वाढली आहे. हेच सत्य आहे. शिवसेना विधानसभा निवडणुकीत किती मागणार यावर मी बोलणार नाही. कारण मी आकडा सांगितला तर मग तुमच्या वाचाळवीरांना आवरा अशी ओरड सुरू होईल. त्यामुळे मी आकडा सांगणार नाही. पण शिवसेनेचा स्ट्राईक रेट सध्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहेत. यामुळे विधानसभा निवडणुकीत निश्चितच फरक दिसून येईल. आता फार अलर्ट राहण्याची गरज आहे. कारण सध्या कोण काय करेल याचा काहीच नेम नाही. राजकारणात दररोज नवनवे प्रयोग होतात. अपक्षही मुख्यमंत्रीपदाची दोर हाती घेऊ शकतात संजय शिरसाट म्हणाले, सद्यस्थितीत महाविकास आघाडीचे काहीच खरे नाही. त्यांची युती होणार किंवा नाही हे ही माहिती नाही. पण अपक्षांचा टेकू आम्हाला टेकू लागणार नाही हे निश्चित. आता दसऱ्याची वाट पाहत आहोत. या मेळाव्यात बरेच काही घडू शकते. 20-25 पक्ष आमदार यंदाच्या विधानसभा निवडणुकीत समीकरण काहीसे वर- खाली गेले तर ते सुद्धा मुख्यमंत्रीपदाची दोर हाती घेऊ शकतात. पण सध्या महायुती जोरात आहे. महायुती- मविआत जागावाटपावर चर्चा उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्यात लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीत जागावाटपाच्या मुद्यावर गरमागरम चर्चा सुरू आहे. त्यातच संजय शिरसाट यांनी आपल्या पक्षाची बार्गेनिंग पॉवर वाढल्याचे सूतोवाच करत ही चर्चा अधिकच गरम होईल अशी शक्यता वाढली आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment