आपला पक्ष प्रामाणिकपणे संघटन राबावतो:संविधान अनुरूप व्यवस्था उभा करणारा एकमेव पक्ष म्हणजे भाजप – CM फडणवीस

आपला पक्ष प्रामाणिकपणे संघटन राबावतो:संविधान अनुरूप व्यवस्था उभा करणारा एकमेव पक्ष म्हणजे भाजप – CM फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे प्रदेश कार्यशाळेत उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्य नोंदणीवर भाष्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की देशामध्ये भारतीय जनता पार्टी एकमेव असा पक्ष आहे की जो प्रामाणिकपणे आपले संघटन राबवतो. देशात प्रत्येक पक्षाला आपले संविधान तयार करावे लागते ते संविधान निवडणूक आयोगाकडे नोंदणी करावी लागते आणि त्या संविधानाच्या अनुरूप लोकशाही पद्धतीने आपले पूर्ण रचना उभी करावी लागते. आपल्याला कल्पना आहे हे जरी कायद्याने खरे असले तरी अशा प्रकारची संपूर्णपणे लोक तांत्रिक पद्धतीने संविधान अनुरूप व्यवस्था उभा करणारा जर कुठला पक्ष आहे तर तो एकमेव पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, याच संपूर्ण संघटनेचा भाग म्हणून आपण सुरुवात प्राथमिक सदस्यांपासून करतो. आपल्याला माहित आहे की देशामध्ये प्राथमिक सदस्यतेची मोहीम संपली. सुरू झाली त्यावेळेस आपल्या निवडणुका होत्या आणि म्हणून आपण केंद्रीय भाजपला विनंती केली होती आणि केंद्रीय भाजपने हरियाणा असेल महाराष्ट्र असेल झारखंड या राज्यांना सूट दिली होती की त्यांनी त्यांच्या निवडणुकीनंतर हे करावं. देशभरामध्ये जवळपास संघटन पर्व हे संपुष्टात आले आहे आपल्याला एक्सटेंडेड वेळ मिळाला आहे. आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्राला सांगितले की महाराष्ट्रात दीड कोटी प्राथमिक सदस्य तयार करेल. ज्या वेळेस या पक्षाचा मोठा विस्तार, 2014 मध्ये आपले अमित भाई शहा हे अध्यक्ष झाल्यानंतर जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजपला बनवायचे आहे असा निर्णय घेऊन आपण संघटन बरोबर सुरू केले आणि देशामध्ये 11 कोटी सदस्य केले चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा सात कोटीचा रेकॉर्ड आपण मोडीत काढला. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्या काळात आपण महाराष्ट्रामध्ये जवळपास एक कोटी सदस्य निर्माण केले होते. आता यावेळी भाजपने स्वतःचे रेकॉर्ड मोडला आहे. 13 कोटी पेक्षा जास्त सदस्य आता देशामध्ये भाजपने केले आहे. आता त्यात ऍड होत जातील. मला या गोष्टीचा आनंद आहे की 98 लाख सदस्य आजपर्यंत आपण केले, म्हणजे दोन-तीन दिवसात एक कोटीचा आकडा पण पार करू. काही जिल्हे आणि काही मतदारसंघ अद्याप मागे राहिले आहेत त्यांनी थोडं लक्ष घातलं तर हा दीड कोटीचा आकडा पार करून आपण पावणे दोन कोटीपर्यंत जाऊ शकतो, पण दीड कोटीचं टार्गेट तर भाजप महाराष्ट्र निश्चित करेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment