आज रात्री किंवा सकाळी खाते वाटप होणार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेत माहिती, अजित पवारांच्या गैरहजेरीचेही सांगितले कारण

आज रात्री किंवा सकाळी खाते वाटप होणार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेत माहिती, अजित पवारांच्या गैरहजेरीचेही सांगितले कारण

राज्य सरकारमध्ये खाते वाटप कधी होणार याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. राज्य सरकारचे खाते वाटप आज रात्री किंवा उद्या सकाळी होऊ शकते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी खाते वाटपावर भाष्य केले. तसेच पत्रकार परिषदेला अजित पवार का उपस्थित नाहीत, याचे कारणही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला परंतु, अद्यापही खाते वाटप झाले नाही. अधिवेशनामध्येच खातेवाटप होईल, अशी चर्चा होती. परंतु तसे झाले नाही. अधिवेशन संपल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना खाते वाटपाबाबत विचारले असता, खाते वाटप लवकरच होणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले. लवकरच म्हणजे आज रात्री किंवा उद्या सकाळी खाते वाटप जाहीर होऊ शकते, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. अजित पवार कुठे गेले? दरम्यान, या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री हजर नव्हते. अजित पवार माझी परवानगी घेऊन बीड आणि परभणीत सरकारकडून गेले आहे. अजित पवार कुठे गेले आहेत? ते आधीच बातमी होऊ नये म्हणून सांगत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिंदेंचा ठाकरेंना टोला
दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशात उद्धव ठाकरे फक्त येऊन गेल्यामुळे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले होते. आता ते आमदारकी वाचवण्यासाठी पर्यटक म्हणून अधिवेशनाला येऊन गेले, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्ध्व ठाकरे यांना लगावला. तसेच विरोधकांनी सभागृहात प्रश्न उपस्थित न करता पायऱ्यांवर व माध्यमांवर प्रश्न मांडले, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment