आरोपीने मागितले अटक वाॅरंट अन् पोलिस तेच विसरले:फेक कॉलरच्या अटकेसाठीगेले अन् 30 तास ताटकळले

पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून ‘मशिदीत बॉम्ब आहे’ असा फेककॉल करणाऱ्या तरुणाला अटक करण्यासाठी गेलेल्या शहरपोलिसांना तब्बल३० तास पुण्यात आरोपीच्या फ्लॅटबाहेरताटकळतबसण्याची वेळ आली. घटनेच्या२३ दिवसांनी पोलिसांना आरोपी निष्पन्न झाला. तो पुण्यातील धनकवडी येथे असल्यानेगुन्हे शाखेचे पथक त्यास अटककरण्यास गेले होते. त्या वेळी एमबीएझालेल्या आरोपीने दरवाजाच्याफटीतून पोलिस बघून अटक वॉरंटचीमागणी केली. त्यामुळे पोलिसांचीएकच गोची झाली. त्यानंतर गुन्हेशाखेस माहिती दिल्यावर बेगमपुरापोलिसांनी सर्व सोपस्कार पूर्ण करूनअटक वॉरंट आणत दीपक शाहूबाढोके (४६, रा. शुभम पॅलेस,चैतन्यनगर, पुणे) यास अटक केली.तेव्हा अटक वॉरंट किती महत्त्वाचेअसते हे पोलिसांना या घटनेवरूनकळले, एवढे मात्र खरे. नियंत्रण कक्षाच्या अंमलदारपार्वती मधुकर भोसले (३८) यांच्याफिर्यादीनुसार, ३१ मार्च रोजीसायंकाळी ६.५७ वाजताआयुक्तालयातील नियंत्रण कक्षाच्यालँडलाइन क्रमांकावर एका अज्ञातमोबाइल क्रमांकावरून फोन आला.”विलास डोईफोडे बॉम्ब ब्लास्ट करनेवाला है, मस्जिद में” असे सांगूनफोन करणाऱ्या व्यक्तीने कॉल कटकेला. त्यानंतर संपूर्ण पोलिस यंत्रणाशहरभर पाहणी करत होती. काहीवेळाने हा कॉल फसवा असल्याचेपोलिसांना निष्पन्न झाले. त्या वेळीसर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.मात्र यापुढे कुणीही असा फेक कॉलकरून यंत्रणा वेठीस धरू नये यासाठीपोलिसांनी त्याचा शोध घेऊन ताब्यातघेतले. आधी मुकुंदवाडीत पोहोचले पथक फोन आल्यानंतर दीपकने नावघेतलेल्या विलास डोईफोडे याचाशोध घेण्यात आला. तो मुकुंदवाडीयेथील निघाल्याने ३१ मार्च रोजी सर्वबॉम्बशोधक पथक त्याच्या घरीदाखल झाले होते. त्याच्या घराचीपूर्ण तपासणी केल्यावर कुठलीहीसंशयास्पद गोष्ट आढळून आलीनाही. त्यानंतर पुण्यातील दीपकच्याफ्लॅटची झाडाझडती घेतल्यावरकाहीही आढळले नाही. पोलिसतपासात दीपकने खोडसाळपणे हाकॉल केल्याचे कबूल केले आहे. एमबीए पदवीधरालाबायकोनेही सोडले दीपक हा बी.एस्सी. व एमबीएचापदवीधर आहे. त्यामुळे त्यालातंत्रज्ञान चांगले अवगत आहे. त्यानेहॉक्स कॉलच्या मदतीने हा कॉलकेला. त्यामुळे त्याचे लोकेशनदुसऱ्या देशातील दिसून येते.दीपकचे लोकेशन अमेरिकेतीलदाखवत होते. मात्र शहर पोलिसांनीसायबर टीमच्या मदतीने हा आरोपीनिष्पन्न केला. दीपक हा काहीसाविक्षिप्त असल्याची माहिती आहे.त्याचा २०१० साली विवाह झालेलाअसून त्याचा घटस्फोट झाला आहे.