आरोपीला जामीन मिळू देऊ नका:कठोर शिक्षा झाली पाहिजे, उपसभापती नीलम गोऱ्हेंचे पोलिसांना पत्र

आरोपीला जामीन मिळू देऊ नका:कठोर शिक्षा झाली पाहिजे, उपसभापती नीलम गोऱ्हेंचे पोलिसांना पत्र

कल्याण येथे एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. यावर शिवसेना नेत्या व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आरोपीला कठोर शिक्षा व्हावी असे निर्देश देखील त्यांनी ठाणे पोलिसांना दिले आहेत. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निवेदनाद्वारे विशेष सूचना दिल्या आहेत. आरोपींना जामीन मिळणार नाही व कठोर शिक्षा होईल यासाठी आवश्यक सर्व पुरावे सादर करावेत. सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच, सरकारच्यावतीने निष्णात अभियोक्त्यांची नियुक्त करावी, असेही उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सूचवले आहे. तसेच पोलिसांनी सीसीटीव्ही व पुरावे तपासून घ्यावेत. बाधित कुटुंबास तत्काळ मदत करून समुपदेशन करावे. त्याचबरोबर लहान मुलींचे अपहरण, अत्याचार रोखण्यासाठी एसओपी तयार करण्यात यावा, अशा सूचना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाणे पोलीस आयुक्त यांना दिल्या आहेत. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. माध्यमांना बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, आरोपीला शंभर टक्के फाशीची शिक्षा होईल, यासाठी सरकारकडून पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. 24 डिसेंबरला पोलिसांना कल्याणजवळच्या बापगाव या ठिकाणी अल्पवयीन मुलीचा मृतदेह फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आला होता. 23 डिसेंबरच्या संध्याकाळी 13 वर्षांची अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी बाहेर पडली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली होती. धक्कादायक माहिती अशी की यात आरोपीला त्याच्या पत्नीची साथ असल्याचे समजते. या प्रकरणी पुढे काय कारवाई केली जाते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment