कारवाई:आता बांगलादेशींची धरपकड, देश सोडू लागले पाकिस्तानी; घुसखोर बांगलादेशींचेही दिवस भरले

पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परत जाण्याचा इशारा देण्यात येत असताना, गुजरात पोलिसांनी अवैध घुसखोर बांगलादेशींविरुद्ध मोठी कारवाई केली. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कारवाईत, शनिवारी पहाटे ३ वाजता, अहमदाबाद पोलिसांनी ८९० आणि सुरत पोलिसांनी १३४ बांगलादेशींना अटक केली. सर्व १०२४ जणांची चौकशी सुरू आहे. कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांना बांगलादेशला पाठवले जाईल. अटक केलेले बांगलादेशी अल-कायदाचा स्लीपर सेल म्हणून काम करत असल्याचा संशय आहे. गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवींनी पोलिसांना बांगलादेशींच्या सर्व हालचालींची चौकशी, कठोर कारवाईचे निर्देश दिले. दोन दिवसांत स्वेच्छेने आत्मसमर्पण करा, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी बांगलादेशींना दिला. पोलिसप्रमुख सहाय म्हणाले की, बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या बंगाली गुन्हेगारी नेटवर्कचा तपास सुरू आहे. अहमदाबादचे डीसीपी शरद सिंघल म्हणाले की, एप्रिल २०२४ पासून आतापर्यंत २ एफआयआर नोंदवून १२७ अवैध बांगलादेशींना पकडत ७७ जणांना हद्दपार करण्यात आले. ३ दिवसांत २९४ नागरिक पाकिस्तानात परतले केंद्राच्या अटारी सीमा बंदच्या आदेशानंतर अटारी सीमेवरून ३ दिवसांत २९४ पाकिस्तानी परतले आहेत. तर ७२७ भारतीय पाकिस्तानातून आले होते. वैध व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना २७ एप्रिलपूर्वी भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे. सल्ला : सैन्याची कारवाई टीव्हीवर थेट प्रक्षेपित करू नका केंद्र सरकारने शनिवारी माध्यमांना लष्कराच्या कारवाया आणि सुरक्षा दलांच्या हालचालींचे थेट प्रक्षेपण करू नये असे निर्देश दिले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटले आहे की अशा प्रकारचे वृत्तांकन अनवधानाने शत्रूंना मदत करू शकते. लंडन : पाक अधिकाऱ्याने दिली गळा चिरण्याची धमकी पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने करणाऱ्या भारतीयांना उच्चायोगात तैनात कर्नल तैमूर राहात यांनी गळा चिरण्याची धमकी दिली. त्या वेळी पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यासाठी भारतीय समुदायाचे लोक पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर जमले होते. गुजरातेत पकडले गेले बांगलादेशी एनआयएने गुन्हा दाखल केला, चौकशी करणार… दरम्यान, पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएने (राष्ट्रीय तपास संस्था) शनिवारी गुन्हा दाखल केला.ते हल्ल्याची चौकशी करतील.दुसरीकडे, हल्लेखोर अतिरेक्यांचा शोध वेगात सुरू आहे. बैसरण व्हॅली परिसर सील करण्यात आला आहे. लष्कराचे जवान, सीआरपीएफ, पोलिस अहोरात्र कारवाई करत आहेत. कोणत्या राज्यात किती पाकिस्तानी पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या मोठ्या कारवाईच्या भीतीने पाकिस्तानात घबराट आहे. पंतप्रधान शरीफ यांना असे म्हणावे लागले आहे की त्यांचा देश कोणत्याही तटस्थ, पारदर्शक चौकशीत सहभागी होण्यास तयार आहे. गृहमंत्री नक्वींनीही शनिवारी लाहोरमध्ये माध्यमांना सांगितले की, “तिसऱ्या देशातील तटस्थ लोकांनी चौकशी केली तर ते सहकार्य करण्यास तयार आहेत.”

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment