आडातच नाही तर पोहऱ्यात कसे येईल?:महाराष्ट्रातील पाणी संकट वाढले; शरद पवारांच्या नेत्याचे, जल जीवन मिशन योजनेवरही प्रश्नचिन्ह

महाराष्ट्रातील पाणी संकट वाढले असून त्यामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. विविध ठिकाणी जल जीवन मिशन योजनेचे काम सुरु असले तरी आडातच पाणी नसल्याचे त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते खासदार भास्कर भगरे यांनी देखील यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते खासदार भास्कर भगरे म्हणाले की, त्यांनी संसदेत पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला होता. या भागात जल जीवन मिशन योजनेचे कामही सुरू आहे. मी अनेक गावांमध्ये गेलो आणि लोकांना भेटलो. लोक पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाण्याची मागणी करत आहेत. ते रोजगाराचीही मागणी करत आहेत. परिसरात 2000-2500 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडतो, परंतु उन्हाळ्यात पाणी नसते. मी हा मुद्दा संसदेत उपस्थित केला. त्यांना पाणी पुरवण्यासाठी योजना असल्याचे सांगितले. जल जीवन मिशन योजनेचे कामही सुरू असल्याचे भास्कर भगरे यांनी वृत्त संस्थेशी बोलताना म्हणाले. गावात पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नसल्यामुळे, महिला आळीपाळीने विहिरीत खोलवर उतरतात, अनेकदा सुरक्षिततेसाठी दोरी शिवाय त्याना विहिरीत उतरावे लागते. पाण्याच्या टंचाईमुळे गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झालाच आहे पण त्याच बरोबर त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भारही पडला आहे. जसजसे संकट वाढत आहे, तसतसे परिस्थिती आणखी बिकट होत आहे. त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील धनगाव गाव या आदिवासी क्षेत्राला देखील पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. 2 ते 3 किलोमीटर पाणी आणण्यासाठी पायपीट यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दैनंदिन वापरण्याचे पाणी मिळविण्यासाठी देखील महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विहिरी आणि हातपंप कोरडे पडल्याने गावकऱ्यांना दररोज 2 ते 3 किलोमीटर पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. हा प्रवास रोजचा संघर्ष बनला आहे. या संदर्भात महिलांनी वृत्त संस्थेची बोलताना सांगितले की, “आम्हाला पाणी आणताना घसरण्याची आणि पडण्याची भीती वाटते. रस्ते खडबडीत आहेत आणि खूप लांब चालावे लागत आहे. पण आमच्याकडे पर्याय नाही. आम्हाला पाण्याची गरज आहे.” महिला आळीपाळीने विहिरीत उतरतात दुसरीकडे पाण्याच्या संकटाचा परिणाम नाशिक जिल्ह्यातील पेठ येथील बोरी चिवरी गावातील महिलांवर ही होत आहे. येथील महिलांना कडक उन्हात दररोज दोन किलोमीटरहून अधिक पायी चालत पाणी आणावे लागत आहे. तरी देखील हे पाणी त्यांच्या कुटुंबाच्या गरजांसाठी अपुरे असते. बोरिचीवारी गावातील महिला पाणी आणण्यासाठी एका खोल, अरुंद विहिरीत उतरतात आणि त्या विहिरी च्यावर, इतर महिला भांडे किंवा घडे धरून उभ्या असतात. गावात पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नसल्यामुळे, महिला आळीपाळीने विहिरीत उतरतात. गावात पाण्याचा स्रोत नसल्याने जीव धोक्यात घालून दूरच्या विहिरीपर्यंत अनेकदा पायी जावे लागते.