अखेर आरोपी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर झाला नतमस्तक:भीमसैनिकांनी रुग्णालयात जाऊन दिली समज, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

अखेर आरोपी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर झाला नतमस्तक:भीमसैनिकांनी रुग्णालयात जाऊन दिली समज, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

परभणी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतीकात्मक प्रतीची 10 डिसेंबर रोजी विटंबना करण्यात आली होती. या घटनेमुळे परभणीमध्ये चांगलेच हिंसक वातावरण निर्माण झाले होते. एका माथेफिरुने केलेल्या या विटंबनामुळे गेली दोन दिवस येथील परिस्थिती तणावग्रस्त झाली होती. अबेडकरांच्या अनुयायांनी या माथेफिरूला चोप दिल्यानंतर डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाल्याचे समोर आले आहे. विटंबना करणारा आरोपी सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. उपचार सुरू असताना परभणी शहरातील काही आंबेडकर अनुयायांनी दवाखान्यात जाऊन त्याच्याशी संवाद साधला. त्यानंतर या आरोपीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओत भीमसैनिक या आरोपीला समजाऊन सांगताना दिसत आहेत त्यानंतर दोन्ही हात जोडून माफी मागत डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाल्याचे दिसते. परभणी येथे झालेल्या हिंसाचारात जवळपास 300 ते 350 जणांवर विविध कलमान्वये एकूण 8 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात 50 जणांना अटक करण्यात आली आहे. यात 41 पुरुष तर 9 महिलांचा समावेश आहे. तसेच 10 शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे नांदेड परीक्षेत्राचे पोलिस महासंचालक शहाजी उमप यांनी सांगितले आहे. या हिंसाचारात सर्वसामान्य नागरिकांना तसेच व्यापऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, परभणी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतीकात्मक प्रतीची 10 डिसेंबर रोजी विटंबना करण्यात आली होती. या घटनेनंतर शहरात चांगलेच वातावरण तापले होते. जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायांनी तसेच भीमसैनिकांनी घटनेच्या निषेधार्थ निषेध मोर्चा काढला होता. तसेच अनेक ठिकाणी हिंसा देखील घडली, माथेफिरू आरोपीला देखील भीमसैनिकांनी चांगलाच चोप दिला होता त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment