आंदोलनानंतर धनंजय देशमुखांना अश्रू अनावर:टाकीवरून खाली उतरताच मनोज जरांगेंना मारली मिठी, जोरजोरात फोडला हंबरडा
मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना उलटून गेला, मात्र, अद्यापही एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. जवळपास 2 ते 3 तास हे आंदोलन चालले. पोलिसांचे आश्वासन आणि मनोज जरांगेंच्या मध्यस्थीनंतर धनंजय देशमुखांनी आंदोलन मागे घेतले. टाकीवरून खाली उतरल्यानंतर धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगेंच्या गळ्यात पडून मोठ्याने हंबरडा फोडला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी टाकीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे जरांगे यांनी तत्काळ मस्साजोगमध्ये दाखल झाले होते. यावेळी मनोज जरांगे यांनी मध्यस्थी करत धनंजय देशमुख यांना टाकीवरून खाली येण्याची विनंती केली. धनंजय देशमुख यांच्या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. धनंजय देशमुख ज्या टाकीवर चढले होते. तिच्याच बाजुला एक दुसरी टाकी आहे. महिला पोलिस अधिकाऱ्यांनी बाजुच्या टाकीवर चढून धनंजय देशमुखांची समजूत घालण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बीडचे एसपी कॉवत यांनी मोबाईलवरुन धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा केली. मात्र, पोलिस संतोष देशमुख हत्याकांडाच्या तपासात कुचराई करत आहेत. त्यांना विष्णू चाटे यांचा मोबाईल अद्याप हस्तगत करता आला नाही. ते आम्हाला तपासाची माहितीही देत नाहीत. या प्रकरणी काहीतरी लपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप करत धनंजय देशमुख यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले होते. मी एसआयटीचे अधिकाऱ्यांशी बोलणे करून देतो, असे आश्वासन एसपी कॉवत यांनी दिल्यानंतर तसेच मनोज जरांगे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर धनंजय देशमुख यांनी आंदोलन मागे घेतले. टाकीवरून खाली उतरल्यानंतर धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे यांना जोरात मिठी मारत हंबरडा फोडला. माझ्या भावाला ज्यांनी संपवले. ज्यांनी कटकारस्थान केले. त्यांना फाशी द्या, अशी मागणी त्यांनी केली. प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, मला अस्वस्थ वाटतंय. उलट्या होत आहेत. मी काही वेळाने बोलतो, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. हे ही वाचा… गुंडांच्या टोळीला संरक्षणाची भिंत घालू नका:खंडणी अन् हत्येचे आरोपी एकच, मस्साजोग प्रकरणी मनोज जरांगे यांचा फडणीसांवर घणाघात बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सोमवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख कुटुंबीयांच्या मागण्या खऱ्या मनाने मान्य केल्या पाहिजेत. ते गुंडांच्या टोळीला संरक्षणाची भींत घालून पीडित कुटुंबीयांशी दुजाभाव करू शकत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा… धनंजय देशमुख यांचे आंदोलन अखेर मागे:पाण्याच्या टाकीवर केले आक्रमक आंदोलन; SP ची निष्पक्ष तपासाची हमी, जरांगेंची मध्यस्थी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी मस्साजोगचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी सोमवारी या प्रकरणी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आक्रमक आंदोलन केले. यात मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचाही सहभाग होता. त्यामुळे पोलिस प्रशासनाची धांदल उडाली होती. पीडित कुटुंबाने या प्रकरणी तपास यंत्रणांच्या तपासावर संशय व्यक्त केला आहे. हे आंदोलन आता मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले आहे. सविस्तर वाचा…