जाहिरातीवरून आघाडी-युतींच्या एकमेकांविरोधात तक्रारी:मविआच्या जाहिरातीत अजित पवारांची, तर भाजपच्या जाहिरातीत कॉंग्रेसची बदनामी

जाहिरातीवरून आघाडी-युतींच्या एकमेकांविरोधात तक्रारी:मविआच्या जाहिरातीत अजित पवारांची, तर भाजपच्या जाहिरातीत कॉंग्रेसची बदनामी

महाविकास आघाडीच्या एका जाहिरातीमधून उपमुख्यमंत्री अजित पवारांना लक्ष्य करत त्यांचे पात्र दाखवण्यात आले आहे. आता, या जाहिरातीविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहून जाहिरातीमधील मजूकर आणि अजित पवारांच्या पात्राचा उल्लेख करत तक्रार दाखल केली आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून अजित पवारांची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न महाविकास आघाडीच्यावतीने केला जात असल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. बदनामीकारक मजकूर, खोटे वृत्त आणि वादग्रस्त आशयाची व्हिडिओ जाहिरात बनवून अजित पवारांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सूरज चव्हाण यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही पत्रातून करण्यात आली आहे. दरम्यान, या जाहिरातीमध्ये एका महिला भगिनीशी बोलताना अजित पवार हे महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये दिले ना असे सांगताना दिसून येतात. मात्र, ह्या दीड हजारांचा दादा तुमचा वाद फसवा असल्याचे ती महिला म्हणते. गुलाबी जॅकेट आणि ढोकळा खाताना अजित पवारांचे पात्र जाहिरातीमध्ये साकारण्यात आल्याचं दिसून येत आहे. महागाई वाढल्याने महाराष्ट्र त्रस्त असून तुम्ही तुमच्या सत्तेत मस्त असल्याचेही जाहिरातीमधील महिला अजित पवारांचे पात्र साकारलेल्या व्यक्तीला बोलताना दिसून येते. सध्या, सोशल मीडियावर ही जाहिरात चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. 1500 रुपयांत काही होत नाही, कारण महिन्याचा खर्च 15 हजारांवर गेलाय, खोटा दादा, फसवा वादा, असेही जाहिरातीमधून म्हटले आहे. तर दुसरीकडे भाजपने एक खोटी जाहिरात दिल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. कॉंग्रेसने वेगवेगळ्या राज्यात खोट्या गॅरंटी दिल्या त्या पूर्ण केल्या नाहीत अशी जाहिरात केली आहे. हे खोटे आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिले आहे. तसेच भाजपवर कारवाई करण्याची मागणी केल्याचे कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment