अजित पवारांचे विश्वासू नेते नॉट रीचेबल:क्रीडा खाते दिल्याने स्वीकारला नाही पदभार, दत्तात्रय भरणे सहकुटुंब परदेशात

अजित पवारांचे विश्वासू नेते नॉट रीचेबल:क्रीडा खाते दिल्याने स्वीकारला नाही पदभार, दत्तात्रय भरणे सहकुटुंब परदेशात

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे मंत्री दत्तात्रय भरणे नाराज असल्याचे समोर आले आहे. दत्तात्रय भरणे हे कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे क्रीडा खाते देण्यात आले होते. मात्र, नाराज असल्यामुळे त्यांनी अद्याप हे मंत्रिपद स्वीकारले नाही. तसेच ते सध्या नॉट रीचेबल असल्याचेही समजत आहे. दत्तात्रय भरणे यांच्या स्वीय सहाय्यकाने दिलेल्या माहितीनुसार भरणे त्यांच्या कुटुंबासह परदेशात गेले आहेत. दत्तात्रय भरणे यांना क्रीडा खाते नको होते, मात्र त्यांना तेच खाते देण्यात आल्याने ते नाराज आहेत. तसेच त्यांच्या सहाय्यकाने भरणे हे मंगळवारी भारतात परत येणार असल्याचे सांगितले आहे. दत्तात्रय भरणे हे पुण्यातील इंदापूर तालुक्यतून आमदार म्हणून निवडून आले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असताना देखील त्यांना मंत्रिपद देण्यात आले होते. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू म्हणूनही त्यांची ओळख आहे. असे असून देखील क्रीडा खाते मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार होऊन अनेक दिवस उलटले असले तरी देखील त्यांनी अद्याप कारभार स्वीकारला नाही. आता ते परदेशातून भारतात आल्यावर पदभार स्वीकारत कामकाजास सुरुवात करणार का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. दरम्यान, अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील मंत्रिपद न मिळाल्याने नाराज आहेत. त्यांच्या आगामी भूमिकेकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. भुजबळ यांच्या पाठीशी ओबीसी नेते आहेत. अजित पवार यांनी त्यानं राज्यसभेवर पाठवण्याचे ठरवले होते. मात्र यावर देखील भुजबळ नाराज आहेत. राज्यसभेवर पाठवायचे होते तर विधानसभेत उभे का केले असा सवाल देखील छगन भुजबळ यांनी अजित पवार यांना उद्देशून विचारला होता. त्यामुळे आता महायुतीमधील नाराज आमदारांची कशी समजूत काढली जाते हे देखील पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment