अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर:कृषीक 2025 भव्य कृषी प्रदर्शन; सुप्रिया सुळे कार्यक्रम अर्धवट सोडून का गेल्या?
बारामती मधील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कृषी प्रदर्शन या कार्यक्रमात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे दोघे एकाच मंचावर आले. मात्र, या दोघांच्या खुर्चीदरम्यान मध्ये आणखी एक खुर्ची ठेवण्यात आली होती. त्यामुळे याबाबतची चांगलीच चर्चा रंगली. विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळे या देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. मात्र त्या सुरुवातीलाच निघून गेल्या. त्यामुळे या सर्व प्रकरणाची राज्यातील राजकारणात चांगली चर्चा रंगली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषीक 2025 या भव्य कृषी प्रदर्शनाला सुरुवात झाली. अजित पवार यांनी या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. याप्रसंगी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, राजेंद्र पवार उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांची संवाद साधला व प्रदर्शनातील वेगवेगळ्या प्रयोगांची माहिती घेतली. विज्ञान केंद्रातील कृषिक 2025 प्रदर्शन म्हणजे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे आकर्षण असते. नव्या संस्कृतीची, कृषी क्रांतीची दिशा शोधण्यासाठी कृषितमध्ये अनेक शेतकरी सहभागी होत असतात. शरद पवार महायुतीमध्ये येण्याची राज्यात चर्चा विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी सहकुटुंब भेट देऊन शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हापासूनच शरद पवार हे पुन्हा एकदा अजित पवार यांच्यासोबत महायुतीमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या दरम्यान आता कृषी प्रदर्शनात देखील शरद पवार आणि अजित पवार हे कार्यक्रमात एकाच यांच्यावर दिसून आले. खासदार सुप्रिया सुळे का निघून गेल्या? शरद पवार यांच्या कन्या आणि बारामती मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मात्र, या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर कार्यक्रम पूर्ण होण्याआधी सुप्रिया सुळे या तेथून निघून गेल्या. त्यामुळे सुप्रिया सुळे नेमक्या का गेल्या? या मागचे नेमके कारण काय? त्यांना दुसरा कार्यक्रम होता की काही राजकीय कारणामुळे खासदार सुप्रिया सुळे तेथून निघून गेल्या? याबाबतच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… खासदार सुप्रिया सुळेंचा तातडीने सैफ अली खान यांच्या कुटुंबियांना फोन:काही मदत करू शकत असेल तर… कुटुंबीयांना दिला दिलासा सुप्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावर बुधवारी रात्री राहत्या घरी एका धारदार शस्त्राने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात सैफ अली खान याला गंभीर दुखापत देखील झाली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमातून तातडीने सैफ अली खान यांच्या कुटुंबियांना फोन केला. मी काही मदत करू शकत असेल तर मला सांगा, मी लगेचच मदत करेल, असा दिलासा सुप्रिया सुळे यांनी सैफ अली खान यांच्या कुटुंबीयांना दिला आहे. पूर्ण बातमी वाचा… मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे:खासदार वर्षा गायकवाड संतापल्या; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर फडणवीसांवर टीका महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अशा घटना वाढत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. या माध्यमातून वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्रातील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुंबईत हे सर्व सुरू असताना मुंबई पोलिस, आयुक्त आणि पोलिस महासंचालक काय काम करत आहेत? असा सवाल वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला. पूर्ण बातमी वाचा… वाल्मीक कराडचे सीम अमेरिकेत रजिस्टर:निवडणुकीच्या काळात या सिम कार्ड वरून काही लोकांना फोन? तपासात धक्कादायक खुलासे बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मकोका खाली अटक करण्यात आलेल्या वाल्मीक कराड याच्या ताब्यातून तपास यंत्रणांनी तीन मोबाईल जप्त केले आहेत. विशेष म्हणजे या मधील काही सिम कार्ड हे अमेरिकेत रजिस्टर झाले आहेत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढेच नाही तर निवडणुकीच्या विशिष्ट काळामध्ये या सिम कार्ड वरून काही लोकांना फोन केले गेले, असा एसआयटीला संशय आहे. त्यामुळे हे फोन का केले गेले? या मागची कारणे कोणती आहेत? याबाबतचा तपास आता एसआयटी करत आहे. पूर्ण बातमी वाचा…