अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास:रामराजे नाईक निंबाळकर दुसऱ्या पक्षात जातील असे वाटत नाही

अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास:रामराजे नाईक निंबाळकर दुसऱ्या पक्षात जातील असे वाटत नाही

आपली साथ व आपला पक्ष सोडून महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर हे जाणार नाहीत, असा विश्वास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यातील वाई येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेनिमित्त व विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार हे वाई, लोणंद, खंडाळा येथे दौऱ्यावर आले होते. वाई येथे जनसन्मान यात्रेची सभा संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज इंदापूर येथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्यानंतर माझ्यावर काही आरोप केले आहेत. परंतु मी त्या आरोपांना उत्तर देणार नाही, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी सांगितले. माझ्याकडे चाळीस आमदार आहेत आणि मला अजून तीस जागांसाठी उमेदवार द्यायचे आहेत. विद्यमान आमदार आणि या नवीन जागा निवडून आणणे मला अवघड नाही, असा विश्वास व्यक्त करून अजित पवार म्हणाले, कोणीही कोणतेही भावनिक आवाहन केले तरी असे भावनिक आवाहन आता चालणार नाही. अजित पवार म्हणाले, लोकांना माझ्या कामाची पद्धत माहिती आहे. समाजामध्ये गैरसमज पसरवून, माझ्या विरोधात वातावरण यापुढे करता येणार नाही. ज्यांच्याकडे विधानसभेसाठी जागांची पोकळी तयार झाली आहे, ही पोकळी भरून काढण्यासाठी मिळेल त्या मार्गाने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे माझ्यावर टीका करून माझ्या पक्षासह इतर अनेकांशी संपर्क साधून पक्षात येण्याचे आवाहन केले जात आहे. यासाठी सगळी पळापळ आणि खटाटोप सुरू आहे. यापेक्षा दुसरे काही नाही. असे सांगत राज्यात महायुतीचे सरकार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल याबाबत मला पूर्ण खात्री आहे, असे ठामपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. लाडकी बहिण योजने विषयी बोलताना पवार म्हणाले लाडकी बहिण योजना व आम्ही दिलेल्या योजना चालू ठेवायच्या असतील तर महायुती सरकार पुन्हा सत्तेत आले पाहिजे. एवढीच आमची भूमिका आहे. विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपांकडे लक्ष द्यायला आमच्याकडे वेळ नाही, विरोधकांच्या कोणत्याच वक्तव्याला, आरोपांना उत्तर देणार नाही ही माझी भुमिका आहे. लाडक्या बहिणींचे आता पर्यंतचे पैसे दिले आहेत. विरोधक चुकीचं बोलतायेत, या योजनेविषयी चुकीच्या वल्गना करून राज्यात सध्या विरोधक दिशाभूल करण्याचा प्रयन्त करीत आहेत. जनता त्यांना भुलणार नाही. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, माझ्याकडच्या ४० मधल्या काही आमदारांना वाटलं वेगळी भुमिका घ्यावी तर घेऊ शकतात. लोकशाही आहे. निवडणूक लढण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीमधल्या काही लोकांना त्यांनी घेतलं होतं. मात्र त्यातलीच काही लोकं माघारी फिरले आहेत. तिसरी, चौथी शक्ती, पाचवी शक्ती, किती शक्ती होतील हे माहित नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर उमेदवार उभे राहतील असेही अजित पवार यांनी भाकित व्यक्त केले.

​आपली साथ व आपला पक्ष सोडून महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर हे जाणार नाहीत, असा विश्वास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यातील वाई येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेनिमित्त व विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार हे वाई, लोणंद, खंडाळा येथे दौऱ्यावर आले होते. वाई येथे जनसन्मान यात्रेची सभा संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज इंदापूर येथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्यानंतर माझ्यावर काही आरोप केले आहेत. परंतु मी त्या आरोपांना उत्तर देणार नाही, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी सांगितले. माझ्याकडे चाळीस आमदार आहेत आणि मला अजून तीस जागांसाठी उमेदवार द्यायचे आहेत. विद्यमान आमदार आणि या नवीन जागा निवडून आणणे मला अवघड नाही, असा विश्वास व्यक्त करून अजित पवार म्हणाले, कोणीही कोणतेही भावनिक आवाहन केले तरी असे भावनिक आवाहन आता चालणार नाही. अजित पवार म्हणाले, लोकांना माझ्या कामाची पद्धत माहिती आहे. समाजामध्ये गैरसमज पसरवून, माझ्या विरोधात वातावरण यापुढे करता येणार नाही. ज्यांच्याकडे विधानसभेसाठी जागांची पोकळी तयार झाली आहे, ही पोकळी भरून काढण्यासाठी मिळेल त्या मार्गाने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे माझ्यावर टीका करून माझ्या पक्षासह इतर अनेकांशी संपर्क साधून पक्षात येण्याचे आवाहन केले जात आहे. यासाठी सगळी पळापळ आणि खटाटोप सुरू आहे. यापेक्षा दुसरे काही नाही. असे सांगत राज्यात महायुतीचे सरकार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल याबाबत मला पूर्ण खात्री आहे, असे ठामपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. लाडकी बहिण योजने विषयी बोलताना पवार म्हणाले लाडकी बहिण योजना व आम्ही दिलेल्या योजना चालू ठेवायच्या असतील तर महायुती सरकार पुन्हा सत्तेत आले पाहिजे. एवढीच आमची भूमिका आहे. विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपांकडे लक्ष द्यायला आमच्याकडे वेळ नाही, विरोधकांच्या कोणत्याच वक्तव्याला, आरोपांना उत्तर देणार नाही ही माझी भुमिका आहे. लाडक्या बहिणींचे आता पर्यंतचे पैसे दिले आहेत. विरोधक चुकीचं बोलतायेत, या योजनेविषयी चुकीच्या वल्गना करून राज्यात सध्या विरोधक दिशाभूल करण्याचा प्रयन्त करीत आहेत. जनता त्यांना भुलणार नाही. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, माझ्याकडच्या ४० मधल्या काही आमदारांना वाटलं वेगळी भुमिका घ्यावी तर घेऊ शकतात. लोकशाही आहे. निवडणूक लढण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीमधल्या काही लोकांना त्यांनी घेतलं होतं. मात्र त्यातलीच काही लोकं माघारी फिरले आहेत. तिसरी, चौथी शक्ती, पाचवी शक्ती, किती शक्ती होतील हे माहित नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर उमेदवार उभे राहतील असेही अजित पवार यांनी भाकित व्यक्त केले.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment