देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आज चहापान:मंत्रिमंडळ खाते वाटप जाहीर होण्याची शक्यता; अजित पवार, धनंजय मुंडे पोहोचले
नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आज चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांच्या घरी दाखल झाले आहेत. इतर मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आणि आमदार देखील देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचत आहेत. या सर्व घडामोडींमुळे आज मंत्रिमंडळाचा खाते वाटप जाहीर होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्यातील असल्यामुळे त्यांच्या निवासस्थानी आज सर्व मंत्री आणि आमदारांसाठी चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील इतर सहकारी आणि आमदार देखील उपस्थित राहतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याप्रमाणे यावेळी मंत्रिमंडळाच्या खात्यावर देखील चर्चा होऊन आजच खाते वाटप जाहीर होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. खातेवाटप कधी जाहीर होणार? याची सर्वांना प्रतीक्षा मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर येथे झाला असला तरी देखील अधिवेशन दरम्यान खातेवाटप जाहीर झालेले नाही. त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. त्यामुळे खातेवाटप कधी जाहीर होणार? याची सर्वांना प्रतीक्षा आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर खाते वाटप जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.