अजित पवारांची संवेदनशीलता VIDEO:अपघात होताच थांबवला ताफा; ॲम्बुलन्समधील डॉक्टरांना प्राथमिक उपचार करण्याचे निर्देश

अजित पवारांची संवेदनशीलता VIDEO:अपघात होताच थांबवला ताफा; ॲम्बुलन्समधील डॉक्टरांना प्राथमिक उपचार करण्याचे निर्देश

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यातच अजित पवार हे शिवाजीनगर परिसरातील संचेती हॉस्पिटलच्या पुलाखालून जात असताना एका दुचाकी आणि रिक्षाचा अपघात झाला. या वेळी पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी तात्काळ ताफा थांबवून अपघात ग्रस्तांना मदत केली. अजित पवार यांच्या ताफ्यातील डॉक्टरांना जखमींवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश देखील अजित पवार यांनी दिले. आता या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांचा ताफा जात असतानाच रस्त्यावर दुचाकी आणि रिक्षाचा अपघात झाला. अपघात होताच अजित पवार यांचा ताफा थांबल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. यावेळी अजित पवार हे स्वतः गाडीतून खाली उतरले. तसेच अजित पवार यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करताना या व्हिडिओ मधून दिसत आहे. तर अजित पवार हे देखील गाडीतून उतरतात. अजित पवार हे कोणाला तरी फोन करून अपघाताची माहिती व सूचना देताना दिसत आहेत. अजित पवार यांनी अपघातग्रस्त व्यक्तीच्या जवळ जात त्याची विचारपूस देखील केली. अपघात मधील व्यक्ती किरकोळ जखमी झाला असल्याचे देखील या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. अपघात ग्रस्त व्यक्ती मी ठीक आहे, असे सांगत असताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. अपघातातील ज्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाल्याचे दिसून येत आहे. या वेळी अपघातातील व्यक्तीवरु ॲम्बुलन्समधील डॉक्टरांना उपचार करण्याचे सांगून अपघात ग्रस्तावर संचिती रुग्णालयांमध्ये प्राथमिक उपचार करा, अशा सूचना अजित पवार यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या. त्यानंतर ते पुढील कामासाठी रवाना झाले. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. राज्यात कायदा नाचवला जातोय!:नागपूर अपघातावर संजय राऊतांचा संताप; फडणवीस गृहमंत्री पदाच्या लायक नसल्याची टीका नागपूर अपघात प्रकरणी बावनकुळे कुटुंबाचा संबंध नसेल तर लपवाछपवी कशासाठी करत आहात? असा थेट प्रश्न उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. नागपूर अपघातात गाडी कोण चालवत होते? सीसीटीव्ही फुटेज गायब का करण्यात आले? गाडीची नंबर प्लेट का काढण्यात आली? एफआरआयमध्ये गाडी मालकाचे नाव का नाही? असे प्रश्न उपस्थित करत राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. फडणवीस गृहमंत्री पदावर राहण्यास लायक नसल्याचा आरोपही त्यांनी केला. पूर्ण बातमी वाचा… अजित पवारांकडून थेट मुख्यमंत्रिपदाची मागणी:अमित शहांकडे राज्यातही बिहार पॅटर्न राबवण्याचा आग्रह; विमानतळावर घेतली भेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची मुंबई विमानतळावर भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपाच्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत अजित पवार यांनी उघडपणे आपल्या मनातील मुख्यमंत्री पदाची मागणी अमित शहा यांच्याकडे केली असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. राज्यांमध्ये देखील बिहार पॅटर्न राबवा आणि मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घोषित करा, अशी मागणी त्यांनी अमित शहा यांच्याकडे केली असल्याची दावा ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. पूर्ण बातमी वाचा…. युगेंद्र पवारांची आजपासून स्वाभिमान यात्रा; तर जय पवारांच्या मंडळांना भेटी:आधी बहिण – भाऊ आणि आता भाऊ – भाऊ; बारामती विधानसभेत दोन छोटे पवार मैदानात? आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून आपण लढणार नसल्याचे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. त्यातच जय पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातील दौरे वाढवले आहेत. विविध गणेश मंडळांच्या आरतीच्या माध्यमातून जय पवार सध्या बारामती मतदारसंघ पिंजून काढत आहेत. तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच युगेंद्र पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघात स्वाभिमान यात्रा काढत आहेत. त्यांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात हे दोन्ही छोटे पवार लढणार का? अशी चर्चा सध्या मतदार संघात होत आहे. पूर्ण बातमी वाचा…

​उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यातच अजित पवार हे शिवाजीनगर परिसरातील संचेती हॉस्पिटलच्या पुलाखालून जात असताना एका दुचाकी आणि रिक्षाचा अपघात झाला. या वेळी पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी तात्काळ ताफा थांबवून अपघात ग्रस्तांना मदत केली. अजित पवार यांच्या ताफ्यातील डॉक्टरांना जखमींवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश देखील अजित पवार यांनी दिले. आता या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांचा ताफा जात असतानाच रस्त्यावर दुचाकी आणि रिक्षाचा अपघात झाला. अपघात होताच अजित पवार यांचा ताफा थांबल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. यावेळी अजित पवार हे स्वतः गाडीतून खाली उतरले. तसेच अजित पवार यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करताना या व्हिडिओ मधून दिसत आहे. तर अजित पवार हे देखील गाडीतून उतरतात. अजित पवार हे कोणाला तरी फोन करून अपघाताची माहिती व सूचना देताना दिसत आहेत. अजित पवार यांनी अपघातग्रस्त व्यक्तीच्या जवळ जात त्याची विचारपूस देखील केली. अपघात मधील व्यक्ती किरकोळ जखमी झाला असल्याचे देखील या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. अपघात ग्रस्त व्यक्ती मी ठीक आहे, असे सांगत असताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. अपघातातील ज्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाल्याचे दिसून येत आहे. या वेळी अपघातातील व्यक्तीवरु ॲम्बुलन्समधील डॉक्टरांना उपचार करण्याचे सांगून अपघात ग्रस्तावर संचिती रुग्णालयांमध्ये प्राथमिक उपचार करा, अशा सूचना अजित पवार यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या. त्यानंतर ते पुढील कामासाठी रवाना झाले. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. राज्यात कायदा नाचवला जातोय!:नागपूर अपघातावर संजय राऊतांचा संताप; फडणवीस गृहमंत्री पदाच्या लायक नसल्याची टीका नागपूर अपघात प्रकरणी बावनकुळे कुटुंबाचा संबंध नसेल तर लपवाछपवी कशासाठी करत आहात? असा थेट प्रश्न उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. नागपूर अपघातात गाडी कोण चालवत होते? सीसीटीव्ही फुटेज गायब का करण्यात आले? गाडीची नंबर प्लेट का काढण्यात आली? एफआरआयमध्ये गाडी मालकाचे नाव का नाही? असे प्रश्न उपस्थित करत राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. फडणवीस गृहमंत्री पदावर राहण्यास लायक नसल्याचा आरोपही त्यांनी केला. पूर्ण बातमी वाचा… अजित पवारांकडून थेट मुख्यमंत्रिपदाची मागणी:अमित शहांकडे राज्यातही बिहार पॅटर्न राबवण्याचा आग्रह; विमानतळावर घेतली भेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची मुंबई विमानतळावर भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपाच्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत अजित पवार यांनी उघडपणे आपल्या मनातील मुख्यमंत्री पदाची मागणी अमित शहा यांच्याकडे केली असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. राज्यांमध्ये देखील बिहार पॅटर्न राबवा आणि मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घोषित करा, अशी मागणी त्यांनी अमित शहा यांच्याकडे केली असल्याची दावा ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. पूर्ण बातमी वाचा…. युगेंद्र पवारांची आजपासून स्वाभिमान यात्रा; तर जय पवारांच्या मंडळांना भेटी:आधी बहिण – भाऊ आणि आता भाऊ – भाऊ; बारामती विधानसभेत दोन छोटे पवार मैदानात? आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून आपण लढणार नसल्याचे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. त्यातच जय पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातील दौरे वाढवले आहेत. विविध गणेश मंडळांच्या आरतीच्या माध्यमातून जय पवार सध्या बारामती मतदारसंघ पिंजून काढत आहेत. तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच युगेंद्र पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघात स्वाभिमान यात्रा काढत आहेत. त्यांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात हे दोन्ही छोटे पवार लढणार का? अशी चर्चा सध्या मतदार संघात होत आहे. पूर्ण बातमी वाचा…  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment