अजित पवारांची 1000 कोटींची संपत्ती मोकळी:आयकरच्या ताब्यात होती संपत्ती, दिल्ली लवादाचा निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्ली लवादाने मोठा दिलासा दिला आहे. गुरूवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आयकर आयकर विभागाने अजित पवार यांची जप्त केलेली मालमत्ता दिल्लीतील लवादाने ही मालमत्ता परत केली आहे. आयकर विभागाने ऑक्टोबर २०२१ मध्ये छापा टाकून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित असलेली सुमारे १,००० कोटींची संपत्ती जप्त केली होती. अजित पवार, पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांच्या मालमत्तांसह नातेवाइकांशी संबंधित मुंबईतील प्रतिष्ठित नरिमन पॉइंट येथील निर्मल टॉवरसह पाच मालमत्ता जप्त केल्या होत्या. शपथविधीपूर्वी एक दिवस आधी अजित पवार दिल्लीला गेले होते.त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी गेल्याचे वृत्त पसरले होते परंतु आपण खासगी कामासाठी गेल्याचा खुलासा अजित पवारांनी शपथविधीनंतर केला होता.