अजित पवारांचे 9 मंत्री शपथ घेणार:छगन भुजबळांच्या मंत्रिपदाबाबत स्पष्टता नाही, महायुतीच्या मंत्र्यांची यादी एका क्लिकवर

अजित पवारांचे 9 मंत्री शपथ घेणार:छगन भुजबळांच्या मंत्रिपदाबाबत स्पष्टता नाही, महायुतीच्या मंत्र्यांची यादी एका क्लिकवर

महायुती सरकार स्थापन झाल्याच्या 10 दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज नागपूर येथे मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन गेले असून ते सर्व नागपूरला रवाला होत आहेत. राष्ट्रवादीकडून 5 जणांना फोन गेले असून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ अद्याप वेटिंगवर आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत होते. परंतु, अद्याप त्यांना पक्षाकडून फोन आला नाही. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळांची वर्णी लागणार का?, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 6 आमदारांना फोन आला आहे. यावरून अजित पवारांचे 9 आमदार आज शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ​राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना फोन
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आज 39 मंत्री शपथ घेणार आहेत. भाजपच्या वाट्याला 20, शिवसेनेच्या वाट्याला 12 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदे मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 मंत्री आज शपथ घेणार आहे. नागपूर येथे हा शपथविधी सोहळा पार पडेल. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रिपदासाठी आज सकाळपासून पक्षाच्या वरिष्ठांनी फोन करून मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी तयार राहण्यास सांगितले. नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची दुसरी वेळ
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे रविवारी, उपराजधानीतील राजभवनात शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली. एक हजार पाहुण्यांची आसन व्यवस्था केली जात आहे. राजभवनातील हिरवळीवर शपथविधी होणार आहे. 15 डिसेंबरला दुपारी 4 वाजता नागपूरमध्ये राजभवनावर हा सोहोळा होत आहे. राज्याच्या राजकीय ईतिहासात नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 22 डिसेंबर 1991 रोजी छगन भुजबळ यांच्यासह डॉ. राजेंद्र गोडे, जयदत्त क्षीरसागर, वसुधा देशमुख, भरत बाहेकर यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली होती. भाजपकडून मंत्रिपदासाठी खालील आमदारांना फोन अतुल सावे,
माधुरी मिसाळ,
चंद्रशेखर बावनकुळे,
अशोक उईके,
आकाश फुंडकर
नितेश राणे
शिवेंद्रराजे भोसले
चंद्रकांत पाटील
पंकज भोयर
मंगलप्रभात लोढा
गिरीश महाजन
जयकुमार रावल
पंकजा मुंडे
राधाकृष्ण विखे पाटील
गणेश नाईक
मेघना बोर्डीकर
जयकुमार गोरे शिवसेनेकडून कोणाला मंत्रिपदासाठी फोन भरत गोगावले
प्रकाश आबिटकर
दादा भूसे
गुलाबराव पाटील
संजय राठोड
संजय शिरसाट
उदय सांमत
प्रताप सरनाईक
शंभूराज देसाई
योगश कदम
आशिष जैस्वा राष्ट्रवादीकडून खालील आमदारांना फोन नरहरी झिरवाळ हसन मुश्रीफ
आदिती तटकरे
बाबासाहेब पाटील
दत्तमामा भरणे

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment