माझ्या आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याच्या धमक्या येत आहेत:अक्षय शिंदेच्या वकिलाचा धक्कादायक दावा, सुरक्षेची केली मागणी

बदलापूर अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर अक्षय शिंदेचे वकील अमित अमित कटारनवरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. माझ्या आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याचे धमक्या येत असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे. वकील अमित कटारनवरे काय म्हणाले?
अमित कटारनवरे म्हणाले, आम्हाला सतत धमक्या सुरू आहेत. माझ्या आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे आम्हाला सेक्युरिटी मिळायबी या संदर्भात न्यायालयाने आदेश दिले आहेत, असे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणात राजकीय वास असल्याचे दिसत आहे. मात्र यावर आता बोलणे घाईचे ठरेल, असेही ते यावेळी म्हणाले. पुढे बोलताना अमित कटारनवरे म्हणाले, हे सर्व प्रकरण न्यायालयात आल्यानंतर प्रकरणातील सर्वांना अटक होत आहे आणि अक्षय शिंदेची अंत्ययात्रा देखील न्यायालयामुळेच झाली. या प्रकरणातील आणखी दोन आरोपींना कर्जत येथून अटक झाली, त्यांना समजले होते की आता अटकपूर्व जामीन शक्य नाही. त्यामुळे हा राजकीय खेळ करण्यात आल्याचा आरोप अमित कटारनवरे यांनी केला आहे. न्यायालयाने उपस्थित केले अनेक प्रश्न
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांनी वकील अमित कटारनवरे यांना अनेक प्रश्न विचारले. पोलिस तपास करत आहेत, पण तुम्ही प्रसिद्धीकरिता बाहेर जाऊन एन्काउंटरच्या घटनास्थळी तपास कसे करू शकता का? अशा शब्दांत न्यायाधीशांनी अक्षय शिंदेच्या वकिलांना सुनावले. अक्षय शिंदेचा फॉरेन्सिक रिपोर्ट आहे का? ती गोळी नेमकी कुठे गेली? आरोपीला पाणी पिण्यासाठी त्याची बेडी काढली का? मग त्याने पाणी पिण्यासाठी काय वापरले होते? चार गोळ्या झाडल्या ना? मग चार बुलेट शेल आहेत का? आणि दोन बंदुकीतून जर ४ गोळ्या झाडल्या तर मग २ वेगळे बुलेट शेल आहेत का? बंदुकीचे फिंगर प्रिंट बदलण्यात आले आहेत का? असे अनेक प्रश्न न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केले. त्यावर सरकारी वकिलांनी ती गोळी गाडीच्या टपाला लागून बाहेर गेली. तसेच त्याला पाणी पिण्यासाठी जी पाण्याची बॉटल दिली होती, ती सापडली असल्याची माहिती दिली.

​बदलापूर अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर अक्षय शिंदेचे वकील अमित अमित कटारनवरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. माझ्या आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याचे धमक्या येत असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे. वकील अमित कटारनवरे काय म्हणाले?
अमित कटारनवरे म्हणाले, आम्हाला सतत धमक्या सुरू आहेत. माझ्या आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे आम्हाला सेक्युरिटी मिळायबी या संदर्भात न्यायालयाने आदेश दिले आहेत, असे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणात राजकीय वास असल्याचे दिसत आहे. मात्र यावर आता बोलणे घाईचे ठरेल, असेही ते यावेळी म्हणाले. पुढे बोलताना अमित कटारनवरे म्हणाले, हे सर्व प्रकरण न्यायालयात आल्यानंतर प्रकरणातील सर्वांना अटक होत आहे आणि अक्षय शिंदेची अंत्ययात्रा देखील न्यायालयामुळेच झाली. या प्रकरणातील आणखी दोन आरोपींना कर्जत येथून अटक झाली, त्यांना समजले होते की आता अटकपूर्व जामीन शक्य नाही. त्यामुळे हा राजकीय खेळ करण्यात आल्याचा आरोप अमित कटारनवरे यांनी केला आहे. न्यायालयाने उपस्थित केले अनेक प्रश्न
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांनी वकील अमित कटारनवरे यांना अनेक प्रश्न विचारले. पोलिस तपास करत आहेत, पण तुम्ही प्रसिद्धीकरिता बाहेर जाऊन एन्काउंटरच्या घटनास्थळी तपास कसे करू शकता का? अशा शब्दांत न्यायाधीशांनी अक्षय शिंदेच्या वकिलांना सुनावले. अक्षय शिंदेचा फॉरेन्सिक रिपोर्ट आहे का? ती गोळी नेमकी कुठे गेली? आरोपीला पाणी पिण्यासाठी त्याची बेडी काढली का? मग त्याने पाणी पिण्यासाठी काय वापरले होते? चार गोळ्या झाडल्या ना? मग चार बुलेट शेल आहेत का? आणि दोन बंदुकीतून जर ४ गोळ्या झाडल्या तर मग २ वेगळे बुलेट शेल आहेत का? बंदुकीचे फिंगर प्रिंट बदलण्यात आले आहेत का? असे अनेक प्रश्न न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केले. त्यावर सरकारी वकिलांनी ती गोळी गाडीच्या टपाला लागून बाहेर गेली. तसेच त्याला पाणी पिण्यासाठी जी पाण्याची बॉटल दिली होती, ती सापडली असल्याची माहिती दिली.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment