अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता:महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची माहिती; लाभार्थींची संख्या घटणार की वाढणार?

राज्य सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्याचा जमा होणार आहे. विशेष म्हणजे यंदा लाभार्थींची संख्या घटणार की वाढणार असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता एप्रिलचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारच्या वतीने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली होती. या योजनेला महाराष्ट्रातील महिलांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. त्यामुळे ही योजना महाराष्ट्र सर्वाधिक लोकप्रिय योजना ठरली आहे. या योजने नंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र निवडणुकीच्या काळात महिलांना 2100 रुपये या योजनेच्या माध्यमातून देण्याचे आश्वासन महायुती कडून अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही. असे असले तरी दरमहा पंधराशे रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होत आहे. एप्रिल महिन्याचे पैसे देखील आता महिलांच्या खात्यात जमा होणार असून अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होतील, असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे लाभ घेणाऱ्या बहिणींवर गुन्हा दाखल बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींवर पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून, सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, या प्रकरणात पुढे काय? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. अर्जदार महिलेला प्रति महिना दीड हजार रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थींची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आला आहे. याबाबत 4 ऑक्टोबर रोजी पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिती तटकरे म्हणाल्या की, सदर बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून, सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. महिला व बालविकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. महिला मतदार डोळ्यासमोर ठेवून विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत सरसकट प्रत्येक अर्जदार महिलेला प्रति महिना दीड हजार रुपये खात्यात पाठवण्यात आले.