ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डावर भाजप अल्पसंख्यक मोर्चाचा आक्षेप:’ऑल इंडिया’ आणि ‘बोर्ड’ शब्द न लावण्याविषयी लिहिले पत्र
एकीकडे मराठी मुस्लिम सेवा संघ तसेच ऑल इंडिया उलेमा बोर्डासारख्या संघटना मुस्लिम व्होट जिहादसाठी फतवे काढीत असताना आता भाजपा अल्पसंख्यक मोर्चाने त्या विरोधात उडी घेतली आहे. मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष खालिद सैफुल्लाह रहमान यांना बोर्डाच्या नावातून “ऑल इंडिया’ आणि “बोर्ड’ शब्द न लावण्याविषयी पत्र लिहिल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड या नावामुळे सर्वसामान्य मुस्लिम नागरिकांची दिशाभूल होत असून त्यांच्यात गैरसमज पसरण्याची शक्यता आहे. “ऑल इंडिया’ आणि “बोर्ड’ हे शब्द वापरण्याचा अधिकार फक्त सरकारी संस्थेला आहे. तुमची संस्था गैरसरकारी असतानाही नावावरून ती सरकारी असल्याचा गैरसमज हksतो. यास्तव नावातून “ऑल इंडिया’ आणि “बोर्ड’ शब्द वगळावे असे सिद्दिकी यांनी लिहिले आहे. आर्थिक व्यवहार सार्वजनिक करत नसल्याने संशय
याशिवाय ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड देशातील समस्त मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करते. वास्तवात असे काहीही नाही. देशात ८०% पसमांदा मुस्लिम समाज आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डात पसमांदा मुस्लिमांना प्रतिनिधित्व देण्यात आलेले नसून त्यांच्या प्रश्नांना बोर्डाने कधीही वाचा फोडली नाही, असा आरोप सिद्दिकी यांनी केला आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे आर्थिक व्यवहार, देणे घेणे तसेच देणग्या कधीही सार्वजनिक केल्या जात नाही, यामुळे संशय निर्माण होतो. हे लक्षात घेता सामान्य मुसलमानाचा गोंधळ वाढू नये म्हणून आपण नावातून “ऑल इंडिया’ आणि “बोर्ड’ शब्द वगळावे याचा पुनरूच्चार सिद्दिकी यांनी केला आहे.